Netflix : आता नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन होणार महाग

नेटफ्लिक्सची सर्वात मोठी बाजारपेठ भारतात
Netflix
Netflixesakal
Updated on

Netflix : नेटफ्लिक्सची सर्वात मोठी बाजारपेठ भारतात आहे. पण इथे सबस्क्रिप्शन देखील स्वस्त आहे. आणि अशाच प्लॅन्सची जास्त मागणी आहे. परंतु गेल्या काही वर्षांत नेटफ्लिक्सच्या किमतीत सातत्याने वाढ होत आली आहे. आता नेटफ्लिक्स पुन्हा एकदा आपल्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया

आता नेटफ्लिक्सचं आपले सबस्क्रिप्शन रेट वाढवण्याच्या तयारीत आहे. नेटफ्लिक्स खरं तर जागतिक स्तरावर सबस्क्रिप्शन वाढवण्याची योजना आखत आहे. याची सुरुवात अमेरिका आणि कॅनडापासून होऊ शकते. यानंतर भारतासह इतर बाजारपेठांमध्ये याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. नेटफ्लिक्सकडून किंमत वाढवण्याची ही दुसरी वेळ असेल.

Netflix
Travel Tips : हॉटेल बुक करण्यापूर्वी 'या' छोट्या पण महत्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

भारतातील नेटफ्लिक्सचे प्लॅन्स

मोबाइल प्लॅन

हा 149 रुपयांचा मंथली प्लॅन आहे, जो एकाच मोबाइल आणि टॅबलेटवर वापरला जाऊ शकतो. यावर, SB 480 pixels वर स्ट्रीमिंग होते.

बेसिक प्लॅन

हा प्लॅन 199 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये सिंगल मोबाइल, टॅबलेट, कॉम्प्युटर आणि स्मार्ट टीव्हीवर स्ट्रीमिंग करता येते. यामध्ये 720 पिक्सलची क्वालिटी मिळते.

Netflix
Travel Tips : हॉटेल बुक करण्यापूर्वी 'या' छोट्या पण महत्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

स्टँडर्ड प्लॅन

या प्लॅनसाठी तुम्हाला मंथली 499 रुपये द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये दोन ठिकाणी स्ट्रीमिंग केले जाते. यामध्ये तुम्हाला 1080 पिक्सेल क्वालिटी मिळेल.

प्रीमियम प्लॅन

या प्लॅनसाठी तुम्हाला दरमहा 649 रुपये द्यावे लागतील. यात 4K आणि HDR व्हिडिओ स्ट्रीमिंगची सुविधा उपलब्ध आहे.

Netflix
Travel Tips: ...तरच ट्रिप होईल बेस्ट; ट्रिप प्लॅन करण्याआधी या गोष्टींचा विचार करा

किती वाढ होईल?

वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन किती वाढेल याबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. नवीन दर कधी लागू होणार याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

Netflix
Travels Ticket : तिकीट दरवाढीचे ‘विघ्न’; ट्रॅव्हल्स कंपन्यांनी केले दुप्पट भाडे

नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन प्लॅन

काही देशांमध्ये नेटफ्लिक्सने सबस्क्रिप्शनच्या किमती कमी केल्या आहेत. या महिन्यात कंपनीने पासवर्ड शेअरिंग फीचर बंद करण्याची घोषणा केली होती. नेटफ्लिक्सने गेल्या वर्षी आपल्या सर्व प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या. ॲड फ्री सबस्क्रिप्शन प्लॅन 15.49 डॉलर मध्ये उपलब्ध होता. तर प्रीमियम प्लॅन 19.99 डॉलर प्रति महिना होता. आता पासवर्ड शेअरिंगसाठी दरमहा 7.99 डॉलर असे वेगळे शुल्क आकारले जाईल असेही जाहीर करण्यात आले आहे.

Netflix
Travel Gadgets : फिरायला जाताय? सोबत ठेवा हे महत्त्वाचे गॅजेट्स! प्रवास होईल आरामदायक

किंमती वाढण्याचे कारण?

हॉलिवूड अभिनेते आणि लेखक प्रदीर्घ काळापासून आंदोलन करत आहेत, त्यामुळे उत्पादन खर्च वाढण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत नेटफ्लिक्सकडून किमती वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.