Tech Tips : WhatsApp वर विकत घेता येणार मेट्रो तिकीट, कार्डदेखील होणार रिचार्ज

व्हॉट्सअ‍ॅपची सुरुवात इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप म्हणून झाली हे आपल्याला सर्वांना माहिती आहे.
WhatsApp
WhatsAppSakal
Updated on

WhatsApp Tech Tips : व्हॉट्सअ‍ॅपची सुरुवात इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप म्हणून झाली हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. कालांतराने यात नवनवीन फिचर्स येत गेले. जसे की, ऑडिओ, व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप कॉलिंग आता यामध्ये आणखी एका फिचरची भर झाली आहे.

WhatsApp
WhatsApp
WhatsApp
what's appवर तुम्हाला कोणी ब्लॉक केले आहे का, हे कसे ओळखाल ?

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आता वरील फिचरशिवाय आता यूजर्सना पेमेंट फिचरदेखील वापरता येणार आहे. अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक नवीन फिचर जोडण्यात आले आहे. याच्या मदतीने आता तुम्ही मेट्रो तिकीट खरेदी करू शकणार आहात. याशिवाय तुमचे कार्डदेखील रिचार्ज करू शकणार आहात.

WhatsApp
मिस कॉल, SMS, Whats app शिवाय 7 पद्धतीने मोबाईल होऊ शकतो हॅक
 Metro
Metrosakal

कुठे देण्यात येणार ही सुविधा

WhatsApp आणि बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) यांनी भागीदारी जाहीर केली आहे. याअंतर्गत नम्मा मेट्रोची व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट आधारित QR तिकीट सेवा सुरू करण्यात आली आहे. चॅटबॉट UPI इंटिग्रेटेड आहे. याच्या मदतीने नम्मा मेट्रोने प्रवास करणारे प्रवासी ऑनलाईन तिकीट खरेदी करू शकणार आहेत.

या सुविधेमुळे प्रवाशांना रांगेत उभे राहून तिकीट काढण्याची गरज भासणार नाहीये. या चॅटबॉटच्या मदतीने प्रवाशी केवळ तिकिटेच नाही तर, त्यांचे मेट्रो कार्डही रिचार्ज करू शकणार आहे. ही पहिली ट्रान्झिट सेवा आहे जी एंड-टू-एंड QR तिकिटिंगसह देण्यात आली असल्याचे BMRCL मत आहे. प्रवाशांसाठी हा चॅटबॉट इंग्रजी आणि कन्नड या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असल्याचे BMRCL ने स्पष्ट केले आहे.

WhatsApp
Whats App 2022 मध्ये घेऊन येणार खास फिचर्स,बदलणार चॅटिंगचा अंदाज

कशी कार्य करते सेवा?

यूजर्स ही सेवा इतर कोणत्याही WhatsApp चॅटबॉट सेवेप्रमाणे वापरू शकता. यासाठी तुम्हाला BMRCL +91 8105556677 च्या अधिकृत WhatsApp चॅटबॉट नंबरवर हाय पाठवावे लागेल. येथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. येथे यूजर्स त्यांच्या गरजेनुसार रिचार्जिंग मेट्रो ट्रॅव्हल पास खरेदी करू शकतील. याशिवाय युजर्स सिंगल ट्रॅव्हल तिकीटही खरेदी करू शकतील. या वर्षाच्या सुरुवातीला मुंबई मेट्रोनेही व्हॉट्सअॅप सेवेवर ई-तिकीट सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.