नागपूर : दिवसभरातून आपल्या मोबाईलवर असंख्य फोटो, व्हिडीओ नाही इतर बऱ्याच काही फाईल्स येत असतात. व्हाट्सअपमधून आलेले सर्व फोटो आपण ऑटो डाउनलोडवर ठेवतो. त्यामुळे कामाचे नसलेले फोटो, व्हिडीओसुद्धा आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होतात. मात्र यामुळे तुमच्या स्मार्टफोनची स्टोरेज स्पेस फुल होते. बऱ्याच वेळी एखादी अतिशय महत्वाची अप्लिकेशन डाउनलोड करताना स्टोरेज स्पेस फुल असा मेसेज आपल्या मोबाईलवर येत्तो आणि आपल्याला ती डाउनलोड करता येत नाही. ही समस्या अनेकांना असते. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला तुच्या मोबाईलमधील स्टोरेज स्पेस वाढवण्याच्या काही टिप्स देणार आहोत.
स्टोरेज स्पेस वाढवण्यासाठी हे नक्की करून बघा
तुमच्या फोनमध्ये स्टोरेज स्पेस वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे तुमचा फोन डेस्कटॉपला कनेक्ट करा. यानंतर ज्या फाईल्स आणि डाटा तुम्हाला नकोय त्या डिलीट करा. मात्र प्रत्येकवेळी हे शक्य नाही. त्यामुळे जेव्हा तुम्हाला स्पेसची गरज भासेल तेव्हा तुमच्या फोनमध्ये सर्वात जास्त जागा घेणाऱ्या आणि कामाच्या नसलेल्या अप्लिकेशन्सना डिलीट करा.
स्टोरेज स्पेस वाढवण्याची दुसरी पद्धत म्हणजे तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्समध्ये जा. ओपन केल्यानंतर कॅशे क्लिअर करा. ज्या अप्लिकेशन्सचं काम नाहीये त्या डिलीट करा किंवा फोटो डिलीट करा.
जर तुम्ही आयफोन वापरत असला तर सेटिंग्स ओपन करा. यानंतर स्टोरेज आणि आयक्लाऊड स्टोरेजवर क्लिक करा. यानंतर में स्टोरेजमध्ये जाऊन डिव्हिजन बघा. इकडून तुम्ही कामाच्या नसलेल्या फाईल्सना डिलीट करू शकता.
तुम्हाला ई-मेलबरोबर आलेल्या फाईल्सना डाउनलोड करण्याची सवय असेल तर तुमच्या फोनमध्ये स्टोरेज स्पेस फुल होऊ शकते. त्यामुळे ई-मेलबरोबर डाउनलोड झालेल्या कामाच्या नसलेल्या फाईल्सना डिलीट करायची सवय लावून घ्या.
जर तुम्हाला वाटतंय की फोनमधून कामाच्या नसलेल्या फाईल्स डिलीट केल्यानंतरही स्टोरेज स्पेस नाहीये तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधील फोटोज, व्हिडीओज आणि इतर काही कामाच्या नसलेल्या अप्लिकेशन्सना डिलीट करा किंवा क्लाउडमध्ये सेव्ह करून ठेवा.
संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.