WhatsApp Tips : आता दोन फोनमध्ये वापरता येणार सेमनंबरचं व्हॉट्सअ‍ॅप; असं करा अ‍ॅक्टिव्हेट

आज प्रत्येकजण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअअ‍ॅपचा वापर करतो.
WhatsApp
WhatsAppWhatsApp
Updated on

How To Activate One WhatsApp In Two Phones : आज प्रत्येकजण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअअ‍ॅपचा वापर करतो. अनेकजणांचा दिवस सुरू झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्हॉट्सअअ‍ॅपवर चॅटिंग करण्यात जातो.

हेही वाचा : मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

WhatsApp
Instagram : एकदम सोप्पयं...इंस्टाग्राम चॅटमधून मॅसेज डिलीट करायचं
WhatsApp
WhatsApp

दिवसागणिक वाढत जाणारी यूजर्सची संख्या लक्षात घेता यावरचा चॅटिंग आणि इतर गोष्टींचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने घेता यावा यासाठी व्हॉट्सअअ‍ॅपकडून वेळोवेळी नव-नवीन फीचर्स दिले जातात. मात्र, अनेकदा काही यूजर्स दोन फोन वापरत असतात. परंतु, व्हॉट्सअअ‍ॅप एकाच फोनमध्ये चालू असते.

परंतु, आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही एकच व्हॉट्सअअ‍ॅप दोन फोनमध्ये वापरू शकणार आहात. विशेष म्हणजे दुसऱ्या फोनमध्ये सेमनंबरचे व्हॉट्सअअ‍ॅप चालू करण्यासाठी तुम्हला सिमकार्डची अजिबात आवश्यक्यता नाहीये.

WhatsApp
Satellite Internet : एलॉन मस्क आणि जिओ सट्टा लावण्याच्या तयारीत असलेलं सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय रे भिडू

एकाच नंबरचे व्हॉट्सअअ‍ॅप दुसऱ्या फोनमध्ये कसे कराल अ‍ॅक्टिव्हेट

1. एकाच नंबरचे व्हॉट्सअअ‍ॅप दुसऱ्या फोनमध्ये चालू करण्यासाठी सर्वात प्रथम वेब ब्राउझर ओपन करून web.whatsapp.com वर जा.

2. यानंतर Request desktop site वर क्लिक करा. येथे तुम्हाला एक QR कोड मिळेल.

WhatsApp
Uber : आता Whatsaap वरून बुक करा राईड; उबरची भन्नाट योजना

3. वरील दोन स्टेप पूर्ण केल्यानंतर यूजर ज्या फोनमध्ये आधीपासून व्हॉट्सअअ‍ॅप वापरत आहे. त्या फोनमधील Settings मध्ये जाऊन व्हॉट्सअअ‍ॅप सिलेक्ट करा. येथे जर एखादा यूजर दुसऱ्या ब्राउझरवर व्हॉट्सअअ‍ॅप वापरत असेल तर, येथून लॉगआउट करणे गरजेचे आहे. असे न केल्यास QR स्कॅनर काम करणार नाही.

4. यानंतर यूजरला पहिल्या फोनवरून दुसऱ्या फोनमधील क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. क्यूआर कोड स्कॅन होताच दुसऱ्या फोनमध्ये व्हॉट्सअअ‍ॅप अ‍ॅक्टिव्हेट होईल.

WhatsApp
Scheduled Message On WhatsApp : आता गर्लफ्रेंडला शेड्यूल करून द्या 'बर्थ डे'च्या शुभेच्छा

वरील सर्व स्टेप्स पूर्ण केल्यानंतर यूजर कोणत्याही अडचणींशिवाय दोन फोनमध्ये व्हॉट्सअअ‍ॅप वापरू शकतील. मात्र, हे करण्यापूर्वी यूजरला दुसर्‍या डिव्‍हाइसवर व्हॉट्सअअ‍ॅप लॉगइन करण्‍यापूर्वी आधीच्या डिव्हाइवरील व्हॉट्सअअ‍ॅप लॉगआउट करावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.