नागपूर : स्मार्टफोनचा जास्त वापर होत असल्याने पॉवर बँकची मागणीही आजकाल वाढायला लागली आहे. बाजारात बरेच पॉवर बँकचे पर्याय उपलब्ध आहेत, परंतु जेव्हा लॅपटॉपसाठी पॉवर बँक घेण्याबाबत चर्चा केली जाते, तेव्हा असा विशेष पर्याय नसतो. परंतु आम्ही तुम्हाला अशा पॉवर बँकेबद्दल सांगणार आहोत जी तुमच्या लॅपटॉपलासुद्धा चार्ज करेल. तसेच, प्रवासात आपल्यासाठी हे खूप उपयुक्त ठरेल. चला तर मग जाणून घेऊया.
मोबिलिटी प्रॉडक्ट्स निर्माता EVM ने आपली Enlappower पॉवरबँक बाजारात आणली आहे. या पॉवर बँकची क्षमता 20000 mAh आहे. ही सी पोर्टच्या आधारे लॅपटॉप चार्ज करू शकते. कनेक्टिव्हिटीसाठी यात सी प्रकारचे कनेक्टर आहेत. याशिवाय 4 फूट लांब वायरदेखील या सोबत उपलब्ध आहे. ही पॉवर बँक बॉडी मेटलची आहे. एन्लापॉवर पॉवरबँकची किंमत 9,999 रुपये आहे आणि त्याला तीन वर्षाची वॉरंटी मिळत आहे.
लॅपटॉपसाठी ठरेल उपयुक्त
ही पॉवरबँक मॅकबुक, आयपॅड, डेल, एचपी, लेनोवो, एलजी ग्राम, आसुस झेनबुक आणि सर्व स्मार्टफोन चार्ज करण्यास सक्षम असेल. लॅपटॉप बॅटरी बर्याचदा जास्त बॅकअप देत नाहीत, म्हणून हे डिव्हाइस बर्यापैकी उपयुक्त ठरू शकते.
Realme आणि Redmi ला देणार टक्कर
जरी विशिष्ट लॅपटॉप चार्ज करणारी पॉवरबँक या पॉवरबँकशी स्पर्धा करण्यासाठी दिसत नाही, परंतु जर फक्त स्मार्टफोनसाठी ओव्हर बँक म्हंटलं तर ती Realme आणि Redmi सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करेल. या दोन्ही कंपन्यांकडे 20000 mAh बॅटरीसह पॉवरबँक्स आहेत, परंतु सध्या लॅपटॉप चार्जिंग डिव्हाइस अस्तित्वात नाही.
संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.