क्या बात है! आता Google Maps मध्ये तुम्हीही करू शकता बदल; Add करू शकता रस्ते 

Now you can make changes in google maps by new drawing tool
Now you can make changes in google maps by new drawing tool
Updated on

नागपूर : Google Maps वर मुख्य रस्ते नेहमीच दाखवलेले असतात परंतु काही वेळा काही लहान रस्ते दाखवण्यात येत नाहीत.. या समस्येवर मात करण्यासाठी, Google Map लवकरच एक नवीन अपडेट करणार आहे, जेणेकरुन यूजर्स Google Mapsमध्ये बदल करून नवीन रस्ते चिन्हांकित करू शकतील आणि चुकीची माहिती देखील डिलीट करू शकतील.

Google ने आपल्या ब्लॉगमध्ये एक नवीन माहिती दिली आहे, ज्यात असे म्हटले आहे की Google Mapsसाठी  ड्रॉईंग टूल लवकरच आणणार आहे. हे टूल मायक्रोसॉफ्टच्या पेंट टूल प्रमाणेच असेल. गुगल मॅप लवकरच  हे टूल 80 देशांमध्ये रिलीज करणार आहे. कंपनी हे टूल तयार करीत आहे कारण बर्‍याच ठिकाणी रस्ते अनेक देशांमध्ये मॅपवर नाहीत. अशा परिस्थितीत लोकांना बर्‍याच वेळा त्रास सहन करावा लागत आहे.

हे टूल फक्त कंप्यूटरवर करणार काम 

गुगल मॅपचे हे एडिटिंग टूल संगणकांसाठी बनवले आहे. आपल्या सभोवताल कोणताही रस्ता Google Maps वर न दिसल्यास आपण तो डिलीट करू शकता.. इतकेच नाही तर त्या वस्ती, ठिकाण किंवा वसाहतीच्या नावाबद्दल चुकीची माहिती दिली गेली असेल तर तीही दुरुस्त करू शकता.  

सात दिवसानंतर माहिती होईल अपडेट 

गुगलने आपल्या यूजर्सना अडचणीपासून वाचवण्याचा आणि खोडकर लोकांना या वैशिष्ट्यापासून दूर ठेवण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. यूजर्सनी माहिती अपडेट केल्यास किंवा चुकीची माहिती काढल्यास सात दिवसांनंतर नवीन माहिती अपडेट केली जाईल.

गुगल मॅपवर रस्ते कसे बनवायचे

याकरता तुम्हाला संगणक किंवा लॅपटॉपवरुन maps.google.com वर जावे लागेल. यानंतर, साइड मेनू बटणावर क्लिक करा. यानंतर एडिट मॅपवर जा आणि गायब असलेला रस्ता निवडा. यानंतर, टूलच्या मदतीने Missing lane  काढा. रस्त्याचे नाव देखील येथे दिले जाऊ शकते. तसेच, चुकीची माहिती देखील हटविली जाऊ शकते.

संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.