YouTube Games : आता चक्क यूट्यूबवर थेट खेळता येणार गेम्स; डाऊनलोड-इन्स्टॉल करण्याची नाही गरज

Play Games on YouTube : सध्या हे फीचर काही मर्यादित यूजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.
YouTube Games
YouTube GameseSakal
Updated on

YouTube Playables Online Gaming : तुम्हाला जर व्हिडिओ गेम्स खेळण्याची आवड असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गुगलचं व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असणारं यूट्यूब एका नवीन फीचरची चाचणी करत आहे. Playables असं या फीचरचं नाव असणार आहे. यामुळे यूट्यूबवरच गेम्स खेळता येणार आहेत. वेगळं सॉफ्टवेअर डाउनलोड किंवा इन्स्टॉल करण्याची गरज भासणार नाही.

सध्या हे फीचर काही मर्यादित यूजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. html5 आधारित मोबाईल आणि डेस्कटॉप गेम्स या माध्यमातून खेळता येणार आहेत. अँड्रॉईड अथॉरिटी नावाच्या कंपनीने याबाबत रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर लवकरच हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध होईल.

YouTube Games
Online Gaming : गेमर्ससाठी मेजवानी; 'स्टीम'ने आपल्या सहा गेम्स केल्या मोफत उपलब्ध! पाहा यादी

कोणत्या गेम्स उपलब्ध?

अँड्रॉईड अथॉरिटीने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये दिसतंय की याठिकाणी 8 बॉल बिलियर्ड्स क्लासिक, अँग्री बर्ड्स शोडाऊन, बास्केटबॉल फाईव्हर, ब्रेन आऊट, कॅरम क्लॅश, क्यूब टॉवर, क्रॉसवर्ड, सॉलिटेअर असे कित्येक गेम्स उपलब्ध आहेत.

यातील बहुतांश गेम्स या मोबाईल गेम्स आहेत. मात्र, त्यांना डेस्कटॉपवर देखील खेळता येऊ शकतं असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. प्लेएबल्स हे फीचर होम स्क्रीनवर उपलब्ध होणार आहे. मात्र, जर यूजर्सना नको असेल तर हे फीचर बंदही करता येणार आहे. (Gaming News)

YouTube Games
Online Gaming : जगप्रसिद्ध व्हिडिओ गेम मोफत मिळवण्यासाठी तीन दिवस बाकी; प्रो-गेमर असाल तर चुकवू नका ही संधी!

कधी होणार लाँच?

हे फीचर नेमकं कधी लाँच होणार याबाबत गुगलने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत याची चाचणी सुरू राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.