नागपूर: Twitter नेहमीच आपल्या नवनवीन फीचर्समुळे यूजर्सना आकर्षित करत असतो. यामुळे Twitterच्या यूजर्सच्या संख्येत झपाट्याने वाढत आहे. यातच भर म्हणून Twitter ने आता एका नवीन फीचरची चाचणी सुरु केली. आता लवकरच Twitterमध्ये शॉपिंगचे फिचर येणार आहे. म्हणजेच आता तुम्ही Twitter वरूनही शॉपिंग करू शकणार आहात. चला तर जाणून घेऊया या नवीन फीचरचे फायदे.
समोर आलेल्या एका नव्या अहवालानुसार, Twitterच्या यूजर्सना शॉपिंगची सुविधाही मिळणार असून यासाठी कंपनी ई-कॉमर्स सेवा सुरू करणार आहे. Twitterनं आपल्या नवीन फीचरची चाचणी सुरू केली आहे आणि हे वैशिष्ट्य प्रथम Android फोनवर परीक्षण केले जात आहे, जे प्रथम Android फोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करुन देईल अशी अपेक्षा आहे.
एका संस्थेच्या अहवालानुसार Twitterच्या शॉपिंग फीचरची चाचणी कतारमध्ये सुरू केली गेली असून काही अँड्रॉइड यूजर्सच्या Twitter अॅपमध्ये शॉपिंग कार्ड्स आणि शॉपिंग लिंक्सचा पर्याय असल्याचेही या अहवालात सांगण्यात आले आहे.
Twitter फीडमध्येच शॉपिंग कार्ड असणार आहे. ज्यासह एक मोठ्या निळ्या रंगाचे शॉप बटण देखील असणार आहे. तसेच, शॉपिंग कार्डमध्ये एखाद्या उत्पादनाच्या किंमतीविषयीही माहिती देण्यात आल्याचे अहवालात नमूद केले आहे. तथापि, अद्याप शॉपिंग वैशिष्ट्याबाबत कंपनीकडून अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. यासाठी युजर्सना थोडी प्रतीक्षा करावी लागेल.
अहवालात असे म्हटले आहे की आपल्या Twitter च्या यूजर्सना चांगल्या सुविधा पुरवत आहे आणि कंपनी त्याच श्रेणीतील नवीन पर्यायांचा विस्तारही करत आहे. यामध्ये नकाशे आणि सुपर फॉलोअर्स एकत्रित फेसबुक सारख्या व्यवसाय प्रोफाइलचा समावेश आहे. जे वापरकर्त्यांना त्यांच्या फॉलोअर्सना देण्यात येणार आहे.
संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.