WhatsApp मध्ये मोठा बदल! पेमेंट करण्यासाठी द्यावा लागणार ID प्रूफ!

WhatsApp मध्ये मोठा बदल! पेमेंट करण्यासाठी द्यावा लागणार ID प्रूफ!
WhatsApp
WhatsApp Sakal
Updated on
Summary

1 नोव्हेंबरपासून अनेक लोकप्रिय स्मार्टफोन्सवर व्हॉट्‌सऍप बंद होणार आहे. अशा फोन्सच्या यादीत Apple iPhone SE, iPhone 6S, iPhone 6S Plus आदींचा समावेश आहे.

जगभरात लोकप्रिय मेसेजिंग App WhatsApp ने काही दिवसांपूर्वी आपल्या प्लॅटफॉर्मवर पेमेंट सेवा जोडली आहे. WhatsApp पेमेंट्‌स सेवा भारत (India) आणि ब्राझीलमध्ये (Brazil) प्रथम आणली गेली आहे. या अंतर्गत WhatsApp वापरकर्ते एकमेकांना पैसे पाठवू शकतात. आता एक अलीकडील रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे, की आगामी काळात वापरकर्त्यांना WhatsApp द्वारे पेमेंट करण्यासाठी त्यांची ओळख पटवून द्यावी लागणार आहे.

WhatsApp
Realme 9 व Realme 9 Pro लवकरच लॉंच होणार! जाणून घ्या किमती

टेक्‍नॉलॉजी फोरम XDA नुसार, WhatsApp च्या Android बीटा व्हर्जन 2.21.22.6 मध्ये काही नवीन वैशिष्ट्ये दिसली आहेत, जे सूचित करतात की App वापरकर्त्यांना पेमेंट करण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून कागदपत्रे सबमिट करण्यास सांगितले जाईल. WhatsApp कडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही, त्यामुळे हा नियम विशिष्ट प्रदेशासाठी असेल की सर्वांसाठी असेल, याची पुष्टी होऊ शकली नाही. तसेच, चाचणीनंतर हा नियम काढून टाकला जाण्याची शक्‍यता आहे.

सध्या WhatsApp भारत किंवा ब्राझीलमध्ये पेमेंटसाठी कोणत्याही प्रकारचे व्हेरिफिकेशन मागत करत नाही. WhatsApp र्ल नंबरद्वारे पेमेंट आणि पडताळणीसाठी UPI सर्व्हिचा वापर करते. अहवालानुसार, हे देखील शक्‍य आहे की कंपनी ही सेवा काही नवीन देशांमध्ये सुरू करणार आहे, जिथे पेमेंटसाठी व्हेरिफिकेशन आवश्‍यक असणार आहे.

WhatsApp
इंटरनेट स्पीडमध्ये पाकिस्तानच्या तुलनेत भारत कुठे आहे?

या फोनवर whatsapp बंद होत आहे

WhatsApp बद्दल आणखी एक महत्त्वाची बातमी अशी, की 1 नोव्हेंबरपासून अनेक लोकप्रिय स्मार्टफोन्सवर व्हॉट्‌सऍप बंद होणार आहे. वास्तविक, WhatsApp आता फक्त Android 4.1 (किंवा जास्त), iOS 10 (किंवा जास्त), KaiOS 2.5.0 (किंवा जास्त) वर चालणाऱ्या स्मार्टफोन्सवर कार्य करेल. याचा अर्थ जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या डिव्हाईसवर WhatsApp बंद होणार आहे. अशा फोनच्या यादीत Apple iPhone SE, iPhone 6S, iPhone 6S Plus आदींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.