Electric Scooter: अवघ्या १ रुपयात वॉरंटी, फ्री चार्जिंगसह बरचं काही; 'या' स्कूटरवरील ऑफर एकदा पाहाच

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी चांगली संधी आहे. एथर एनर्जीच्या स्कूटर खरेदीवर कंपनी आकर्षक ऑफर देत आहे.
Ather
AtherSakal
Updated on

Offer On Ather Electric Scooter: बंगळुरू येथील ईव्ही स्टार्ट-अप एथर एनर्जीने ग्राहकांसाठी खास ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला अवघ्या १ रुपयात अनेक सुविधा मिळतील. एथर एनर्जीची ही ऑफर केवळ डिसेंबर महिन्यासाठी लागू आहे. या ऑफर अंतर्गत आकर्षक फायदे, सोपे फायनान्स पर्याय आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. विशेष म्हणजे तुम्हाला अवघ्या १ रुपयात ६,९९९ रुपयात मिळणारी एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी दिली जात आहे.

या ऑफर अंतर्गत इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीवर ३ वर्षांसोबतच २ वर्षांची अतिरिक्त बॅटरी दिली जात आहे. तुम्ही स्कूटरच्या बॅटरीची वॉरंटी ५ वर्षांपर्यंत वाढवू शकता. या ऑफरचा फायदा केवळ डिसेंबर महिन्यातच घेता येईल. Ather 450X आणि Ather 450 Plus स्कूटर खरेदी करणाऱ्यांना या ऑफरचा फायदा मिळेल.

हेही वाचा: Swasthyam 2022: प्राणायाम करताना या सात गोष्टी लक्षात ठेवा

IDFC बँकेशी केली भागीदारी

ग्राहकांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी एथर एनर्जीने IDFC बँकेसोबत भागीदारी केली आहे. या अंतर्गत ग्राहक एथरच्या इलेक्ट्रिक स्कूटरला ४८ महिन्यांच्या ईएमआयसह खरेदी करू शकता. तसेच, जुनी स्कूटर एक्सचेंज केल्यास ४ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल.

Ather
Electricity Bill: घरातील 'हे' दोन डिव्हाइस त्वरित बदला, वीज बिल येईल निम्म्यापेक्षा कमी

चार्जिंग सुविधा मोफत

कंपनी डिसेंबर महिन्यात 450X आणि 450 प्लस या स्कूटरला खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एथर ग्रिडचा मोफत अ‍ॅक्सेस देत आहे.

ग्राहक एथर ग्रिडद्वारे फ्री फास्ट चार्जिंगसह देशभरात चार्जिंग पॉइंट्सचा उपयोग करू शकतात. वाहनांना मोफत चार्ज करण्याची देखील सुविधा मिळते. एथर ग्रिड संपूर्ण भारतात ७०० पेक्षा अधिक एथर ग्रिड पॉइंट्सवर फास्ट चार्जिंगची सुविधा प्रदान करते.

या ऑफरबाबत माहिती देताना एथर एनर्जीचे वरिष्ठ अधिकारी रवनीत एस फोकेला यांनी सांगितले की, हे वर्ष आमच्यासाठी अभूतपूर्व ठरले आहे. आम्ही वेगाने विस्तार करण्यासोबतच मुख्य प्रवाहात येण्यासाठी पाऊल टाकले आहे. आम्हाला वर्ष २०२३ मध्ये देखील असाच प्रतिसाद मिळण्याची आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.