OLA Cabs : ओलाचा गुगल मॅपला रामराम; बनवलं स्वदेशी ओला मॅप, करणार इतक्या कोटींची बचत

OLA Update : कमी वर्षांमध्येच लोकांच्या पहिल्या पसंतीस उतरलेले Ola Cabs आता स्वदेशी Ola Maps वापरणार आहे.
Ola Cabs Ditches Google Map
Ola Cabs Ditches Google Mapesakal
Updated on

OLA Maps : कमी वर्षांमध्येच लोकांच्या पहिल्या पसंतीस उतरलेले Ola Cabs आता स्वदेशी Ola Maps वापरणार आहे. यामुळे कंपनीला दरवर्षी 100 कोटी रुपये इतकी बचत होणार आहे. याआधी ओला Google Maps वापरत होती. परंतु आता कंपनीने स्वबळावर मॅप्स विकसित केले आहे.

कब आपल्या सर्वांनाच माहिती आहे. जवळची किंवा लांबची कोणतीही राईड असो अगदी काही क्षणात आपण बुक करू शकतो आणि आपल्याला हवे त्या ठिकाणी पोहोचू शकतो.आता आपल्या स्वदेशी कंपनीने हा मोठा निर्णय घेत वापरकर्त्यांना वेगळा अनुभव घेण्याची संधी दिली आहे.

Ola चे सहसंस्थापक आणि चेअरमन भाविश अग्रवाल यांनी ही घोषणा केली. त्यांनी सांगितले, "आम्ही आता पूर्णपणे स्वदेशी Ola Maps वापरणार आहोत. यामुळे आम्हाला दरवर्षी 100 कोटी रुपयांची बचत होईल. तुम्ही देखील तुमच्या Ola अॅपमध्ये अपडेट लवकरच अपडेट करा ,असे आवाहन त्यांनी ओला वापरकर्त्यांना केले आहे.

Ola Cabs Ditches Google Map
Email Delete : ईमेल्सचा भडिमार झालाय? आता चिंता नाही, एका क्लिकवर डिलीट करा हवे तेवढे ईमेल,वापरा सोपी ट्रिक

ओला याशिवाय Ola Maps मध्ये येत्या काही महिन्यांत अनेक अपडेट्स येणार आहेत. जसे की - स्ट्रीट व्ह्यू, 3D मॅप्स, Drone मॅप्स आणि इमारतीच्या आतील मॅप्स.

Ola ने नुकतीच स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी कृत्रिमची Cloud सेवा सुरु केली आहे. याच कंपनीने Ola Maps देखील विकसित केले आहेत.

Ola Cabs Ditches Google Map
Sunita Williams Space Mission: सुनीता विल्यम्सच्या परतीबद्दल नासाने दिली खुशखबर! फक्त एवढ्या दिवसात पृथ्वीवर परतणार अंतराळवीर

दरम्यान, Ola Electric सध्या त्यांच्या स्कुटीसाठी सॉलिड-स्टेट बॅटरीवर देखील संशोधन करत आहे. येत्या वर्षात या बॅटरी स्कुटीमध्ये बसवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी Appleच्या एका पुरवठादार कंपनीने विवाहित महिलांना नोकरी नाकारली असता ओला कंपनीने त्याचा विरोध करत आपल्या ऑटोमोबाईल कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांना जास्त संधि देण्याची तसेच फक्त महिला कर्मचाऱ्यांची एक कंपनी बनवण्याची घोषणा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.