बेंगळुरू : ओला इलेक्ट्रिक या भारतातील सर्वात मोठ्या प्युअर-प्ले ईव्ही कंपनीने सणासुदीच्या काळासाठी ओलाची बिगेस्ट ओला सीझन सेल मोहिम 'बॉस' ऑफर्सचा भाग म्हणून '७२ अवर्स रश'ची घोषणा केली. ग्राहक एस१ पोर्टफोलिओवर जवळपास २५,००० रूपये सूटचा आणि स्कूटर्सवर जवळपास ३०,००० रूपयांच्या अतिरिक्त फायद्यांचा लाभ घेऊ शकतात, ज्यामुळे हा ईव्ही खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. ग्राहक ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत या ऑफर्सचा आनंद घेऊ शकतात.