ओला ई-स्कूटरची प्रतीक्षा संपली! 'या' तारखेपासून मिळणार डिलिव्हरी

Ola Scooter
Ola Scooter Google
Updated on

ओला इलेक्ट्रिक स्कूटरची अनेक जण बऱ्याच दिवसांपासून वाट पाहात आहेत. देशात लाँच झाल्यापासून या स्कूटरची मागणी खूप वेगाने वाढली आहे. आता ग्राहकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कंपनी लॉन्च झाल्याच्या 4 महिन्यांनंतर ही स्कूटर ग्राहकांना डिलीव्हर करण्यासाठी सज्ज आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

अग्रवाल यांनी सांगितले की, 15 डिसेंबर 2021 पासून नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना मिळणे सुरू होईल. कंपनीने आधी 25 ऑक्टोबर आणि नंतर 25 नोव्हेंबरपासून डिलिव्हरी सुरू करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान Ola S1 ची किंमत 1 लाख रुपयापासून सुरु होते जी S1 Pro साठी 1.30 लाख रुपयांपर्यंत जाते.

S1 Pro एका चार्जमध्ये 180KM पर्यंत चालेल

ओला इलेक्ट्रिकने ही स्कूटर S1 आणि S1 Pro या दोन व्हेरिएंटमध्ये सादर केली आहे. यामध्ये, जेथे S1 2.98 kWh बॅटरी पॅकसह येते तर S1 Pro 3.97 kWh बॅटरी पॅकसह देण्यात आली आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर S1 ही स्कूटर तब्बल 120 KM पर्यंत धावू शकते आणि S1 Pro एका चार्जवर 180 KM पर्यंत धावू शकते. या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिलेल्या सबसिडीनुसार कमी अधिक आहेत.

Ola Scooter
आयफोन चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच येतोय खिशाला परवडणारा 5G iPhone

या दोन्ही ई-स्कूटरचे उत्पादन चेन्नई, तामिळनाडू येथे असलेल्या ओला इलेक्ट्रिकच्या प्लांटमध्ये केले जात आहे. कंपनीने त्याच आवारात नवीन हायपरचार्जर बसवले आहेत. काही काळापूर्वी, ओला इलेक्ट्रिकने ग्राहकांना हायपरचार्जरच्या सुविधेसाठी देशभरातील 400 शहरांमध्ये 1 लाखाहून अधिक टचपॉइंट इंस्टॉल करणार असल्याचे सांगीतले आहे. दरम्यान ओला इलेक्ट्रिकचा हा चेन्नईमधील प्लांट जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारा प्लांट बनणार आहे.

Ola Scooter
रेडमीचा 5G फोन भारतात लॉंच; स्वस्तात मिळतायेत भन्नाट फीचर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.