Ola EV: ओला इलेक्ट्रिक स्कुटर झाली स्वस्त! तीन दिवसात 10,000 युनिट्सची विक्रमी विक्री

Ola Electric Scooter marathi News : कंपनीनं गेल्याच आठवड्यात S1 pro, S1 Air आणि S1 X या मॉडेलच्या स्कुटरच्या किंमती कमी करत असल्याचं जाहीर केलं होतं.
Ola Electric
Ola Electric esakal
Updated on

Ola Electric Scooter : Ola इलेक्ट्रिक स्कूटरनं एक नवा विक्रम नोंदवला आहे. गेल्या तीन दिवसांत या कंपनीच्या १०,००० स्कूटर्सची विक्री झाली आहे. कंपनीनं गेल्याच आठवड्यात S1 pro, S1 Air आणि S1 X या मॉडेलच्या स्कुटरच्या किंमती कमी करत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळं स्कूटर स्वस्त झाल्यानं ग्राहकांच्या खरेदीसाठी उड्या पडल्या. मनी कन्ट्रोलनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Ola Electric sells 10000 scooters in three days after price cut)

Ola Electric
Ola Price Cut : ई-स्कूटर घेण्याची हीच संधी! ओलाने कमी केली आपल्या गाड्यांची किंमत; मिळणार तब्बल 25,000 रुपये सूट

गेल्याच आठवड्यात ओला कंपनीनं आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती कमी करत असल्याची घोषणा 16 फेब्रुवारी रोजी केली होती. त्यानुसार, आपल्या S1 pro, S1 Air आणि S1 X या मॉडेलच्या स्कुटरच्या किंमती २५,००० रुपयांनी कमी करत असल्याचं जाहीर केलं होतं. किंमतीत बदल झाल्यामुळं कंपनीने गेल्या 72 तासांत S1 स्कूटरची तिप्पट विक्री केली होती, अर्थात तीन दिवसांत सुमारे 10,000 म्हणजेच दररोज 3,000 पेक्षा जास्त स्कूटर्सची विक्री झाल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. (Latest Maharashtra News)

Ola Electric
Rajiv Jain On LIC Shares : माझं ते चुकलं...! अदानींना संकटातून बाहेर काढणाऱ्या राजीव जैन यांनी LIC वरून व्यक्त केला पश्चाताप

मार्चच्या पहिल्या आठवड्यात विक्रीचा सरकारी आकडा येणार

पण फेब्रुवारीमध्ये कंपनीच्या किती EV दुचाकींच्या विक्रीचा सरकारी डेटा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उपलब्ध होईल. कंपनीनं किंमती कमी केल्यानं फर्मच्या S1 Pro, S1 Air आणि S1 X+ या स्कूटरच्या किंमती फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत अनुक्रमे रु. 1 लाख 29 हजार 999, रु 1 लाख 04 हजार 999 आणि रु 84 हजार 999 मध्ये उपलब्ध आहेत. (Marathi Tajya Batmya)

Ola Electric
FD Rate: बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी खुशखबर! FDच्या व्याजदरात केली वाढ, काय आहेत नवीन दर?

ओला ठरली दोन सरकारी अनुदानांसाठी पात्र

ओला इलेक्ट्रिक अलीकडेच सरकारच्या उत्पादन-लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेसाठी पात्र ठरल्यामुळेही किंमती कमी झाल्या आहेत. फर्मच्या S1 Air आणि S1 Pro या दोन्ही कंपन्यांना आतापर्यंत PLI प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. “ओला इलेक्ट्रिक ही PLI योजनेंतर्गत दोन सरकारी अनुदान मिळवणारी एकमेव 2W व्हीलर निर्माता कंपनी आहे आणि Ola ला PLI अंतर्गत मंजूर केलेल्या प्रत्येक स्कूटरवर रु. 15,000 ते रु. 20,000 लाभ मिळतो,” अस सूत्रांनी सांगितलं आहे.

Ola Electric
Dunzo Crisis: कोण होणार डंझोचा नवा मालक? टाटा आणि झोमॅटोच्या स्पर्धेत 'या' कंपनीने मारली बाजी

ओला ईव्हीचा बाजारातील वाटा मोठा

ओला इलेक्ट्रिकचा भारतातील ईव्ही उत्पादकांमध्ये बाजारातील मोठा वाटा कायम आहे. जानेवारीमध्ये, या कंपनीनं TVS मोटर्सच्या 15,279 आणि बजाजच्या 10,855 स्कूटरच्या विक्रीच्या तुलनेत 40 टक्के मार्केट शेअरसह 32,293 पेक्षा जास्त स्कूटर विकल्या होत्या. कंपनीनं अलीकडेच S1X स्कूटरसह परवडणारी EV श्रेणी लॉन्च केली आहे, ज्याच्या किंमती 79,999 रुपये प्रति युनिटपासून सुरू आहेत. (Latest Marathi News)

Ola Electric
SEBI: 'झी'चा पाय पुन्हा गोत्यात! कंपनीमध्ये 2,000 कोटींची हेराफेरी; शेअर्समध्ये झाली मोठी घसरण

ओला स्कूटर आता उत्पादन वाढवणार

कंपनीच्या तामिळनाडूतील कृष्णगिरी इथल्या प्लान्टमध्ये वार्षिक 1 दशलक्ष इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती क्षमता आहे, ती क्षमता दुप्पट करण्याचा विचार सध्या कंपनी करत आहे. "पुढील सहा ते नऊ महिन्यांत, आमची एकूण उत्पादन क्षमता सध्याच्या 1 दशलक्ष प्रतिवर्षावरून 2 दशलक्षांपर्यंत नेण्याची तयारी आहे. आमच्याकडे सध्या असलेली क्षमता प्रतिवर्षी 10 दशलक्ष स्कूटर्सपर्यंत वाढवायचं आमचं अंतिम ध्येय आहे," ओला इलेक्ट्रिकचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक भविश अग्रवाल यांनी हे नुकतेच सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.