Ola Layoff : दिग्गज कंपन्यांनंतर ओलामध्ये होणार इतक्या कर्मचाऱ्यांची कपात

जगातील अनेक देशांवर मंदीचे सावट निर्माण झाले आहे.
Ola Layoff
Ola Layoff Sakal
Updated on

Ola Layoff News : जगातील अनेक देशांवर मंदीचे सावट निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी अनेक दिग्गज कंपन्यांकडून कर्मचारी कपातीची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Ola Layoff
IND vs SL : भारतीय संघाला मोठा धक्का; द्रविडची तब्येत बिघडली, चेकअपसाठी बेंगळुरूला रवाना

मंदीच्या बातम्यांमध्ये आता राइड-शेअरिंग कंपनी ओलाने कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. टेक आणि प्रोडक्ट टीममधून सुमारे 200 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Ola Layoff
Shirdi Bus Accident : शिर्डी बस अपघातातील मृतांची ओळख पटली; सात वर्षांच्या चिमुरड्यासह १० ठार

मात्र, ही कर्मचारी कपात रीस्ट्रक्चरिंग असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. यात ओला कॅब, ओला इलेक्ट्रिक आणि ओला फायनान्शियल सर्व्हिसेस विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मंदीच्या सावटाखाली अनेक कंपन्यांनी यापूर्वीच कर्मचारी कपात घोषित केली आहे. यात काही दिवसांपूर्वीच दिग्गज ई-कॉमर्स कंपनी Amazon ने 18,000 कर्मचारी कपातीची घोषणा केली होती.

Ola Layoff
Video : बारामतीचं घड्याळ बंद पाडण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बावन्नकुळेंच्या कार्यक्रमात चाललंय काय?

याशिवाय गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज गोल्डमन सॅक्सनेदेखील जगभरात मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी सुरू केली असून, कंपनीच्या या कपातीमुळे 3,200 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे. कंपनीच्या नफ्यात सातत्याने घट होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.