सध्या इलेक्ट्रीक स्कूटरची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यादरम्यान Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या 31 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, ओला एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी असलेली दिसत आहे, ज्यामधून धूर आणि जाळ निघताना दिसत आहे.
न्यूज18 ने दिलेल्या वृत्तानुसार, ओलाने आगीच्या घटनेला दुजोरा दिला आहे. कंपनीने सांगितले की, त्यांना पुण्यातील Ola S1 Pro मध्ये आग लागल्याची माहिती मिळाली असून आगीच्या कारणाचा शोध सुरू आहे. स्कूटरचा चालक पूर्णपणे सुरक्षित असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु लिथियम-आयन बॅटरीचे खराब होणे किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
लिथियम-आयन बॅटरीमध्ये आग विझवणे खूप कठीण आहे. पाण्याच्या संपर्कात आल्यावर ते लगेच हायड्रोजन वायू आणि लिथियम-हायड्रॉक्साइड तयार करते. हायड्रोजन वायूने आग लागते. मात्र, कारण काहीही असो, इलेक्ट्रिक स्कूटरला अशा प्रकारे आग लागणे ही नक्कीच भीतीदायक घटना आहे.
दरम्यान ही स्कूटर 115kmph च्या टॉप स्पीडसह आणि 180KM पर्यंत पूर्ण चार्जिंग रेंजसह येते. त्याची किंमत 1,29,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.98kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. Ola S1 हे बॅटरीच्या आतील भाग वगळता पूर्णपणे लोकल उत्पादन आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.