Ola scooter खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. कंनपीचे सीईओ भाविष अग्रवाल यांनी सांगितले की,'' ग्राहकांच्या सर्व S1स्कुटरला S1 proमध्ये अपग्रेड करणार आहे. ओला S1 खरेदीदारकांना S1 PROप्रोचे तुलनेत सामान हार्डवेअर त्याच किंमतीत देणार आहे आणि त्याशिवाय त्यांना कोणी अतिरिक्त रक्कम देण्याची आवश्यकता नाही.
भाविश अग्रवाल यांनी ट्विट केले आहे की, आम्ही सर्व S1 ग्राहकांना S1 Pro हार्डवेअर अपग्रेड करून देणार आहे. ग्राहकांना S1च्या सर्व सुविधा मिळतील आणि प्रो रेंजमध्ये हायपर मोड, किंवा इतर सुविधां अपग्रेडकरून अनलॉक करू शकता. '' त्यांना आपल्या ग्राहांकाचे आभार व्यक्त करत ही स्कूटर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये उपलब्ध केली जाईल असे सांगितले आहे.
मागिल आठवड्यात कंपनीने सांगितले होते की स्कुटर बुक केले आहे त्यांच्यासाठी लास्ट पेमेंट विडो २१ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता ओला अॅपवर सुरू केले जाईल. ओला इलेक्ट्रिक मागील वर्षी आपल्या S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. पण स्कूटर डिलिव्हरीसाठी ठरलेल्या शेड्यूलपेक्षा उशीर झाला. कंपनीने अखेर डिसेंबरमध्ये चेन्नई आणि बंगळूरूमधील ग्राहकांना पहिले १०० स्कुटरची डिलिव्हरीसोबत स्कूटर पाठविण्यास सुरूवात केली.
Ola Electricने गेल्या वर्षी S1 और S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केला होता, जो Etergo AppScooter नुसार डिझाईन केला होता. ओला इलेक्ट्रिक स्कूटर्सनी ग्राहकांना पाठवणे सुरू केले आहे आणि त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. ओला स्कूटरच्या वैशिष्ट्यांना आणि डिझाइनला ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना, स्कूटरची वास्तविक रेंज EV कंपनीने घोषित केलेल्या मर्यादेपेक्षा खूपच कमी असल्याचा दावा केला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.