Mobile Cover Cleaning Tips : आजकाल जवळपास सगळेच आपला मोबाईल कव्हरमध्ये ठेऊन वापरतात. मोबाईलच्या सुरक्षेसाठी देखील ते गरजेचं आहे. आपल्या स्टायलिश मोबाईलचा लुक कव्हरमधूनही दिसावा, यासाठी कित्येक जण पारदर्शक मोबाईल कव्हर वापरतात. मात्र, काही काळानंतर हे कव्हर पिवळं पडायला सुरुवात होते.
यानंतर मग हे कव्हर टाकून देऊन, नवीन कव्हर घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. तुम्हालाही असंच वाटत असेल तर थोडं थांबा! खरंतर तुम्ही तुमचं जुनं कव्हर देखील धुवून अगदी नव्यासारखं करू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत.
फोन कव्हर धुण्यासाठी बेकिंग सोडा वापरुन तुम्ही त्यावर असणारे सर्व पिवळे डाग घालवू शकता. यासाठी तुम्हाला फोनचं कव्हर आधी एका बाजूला ठेवावं लागेल. त्यानंतर त्यावर भरपूर प्रमाणात बेकिंग सोडा टाका. या कव्हरवर असणारे सर्व डाग बेकिंग सोडाने झाकले जायला हवेत.
यानंतर एक जुना टूथब्रश घ्या. हा टूथब्रश पाण्याने थोडा ओला करून, त्याने मोबाईल कव्हर घासायला सुरु करा. गोल-गोल ब्रश फिरवत मोबाईल कव्हर घासा. बेकिंग सोडा चांगल्या प्रकारे कव्हरला स्वच्छ करेल. यानंतर साध्या पाण्याने हे कव्हर धुवून घ्या.
यानंतर हे कव्हर स्वच्छ दिसेल. मात्र, तरीही यावरील डाग पूर्णपणे गेले नाहीत. तर डिशवॉश लिक्विडचा वापर करुन पुन्हा एकदा हे कव्हर धुवून घ्या.
डिशवॉश सोप, म्हणजेच भांड्याच्या साबणाचा वापर करूनही तुम्ही आपल्या मोबाईलचं कव्हर स्वच्छ करू शकता. यासाठी एका बाउलमध्ये थोडं गरम पाणी घेऊन, त्यामध्ये डिशवॉश सोप लिक्विडचे दोन-तीन थेंब टाका. त्यानंतर एक ब्रश घेऊन, या पाण्याच्या मदतीने मोबाईल कव्हर घासून घ्या. विशेषतः जिथे डाग आहेत, त्या ठिकाणी अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ करा.
यानंतर मोबाईल कव्हर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे हे कव्हर अगदी नव्यासारखं होईल. मोबाईलचं कव्हर स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी ते धुणं गरजेचं आहे.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.