तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर OnePlus 10 Pro भारतात 31 मार्च रोजी लॉन्च होईल. कंपनीने आज या मोस्ट अवेटेड लॉन्च इव्हेंटबद्दल ट्विट केले आहे. OnePlus 10 Pro भारतात 31 मार्च रोजी संध्याकाळी 7:30 वाजता लॉन्च होईल. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, AMOLED डिस्प्ले आणि Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट असेल. इव्हेंटमध्ये फोनसोबत, कंपनी OnePlus Buds Pro सिल्व्हर एडिशन आणि बुलेट वायरलेस Z2 देखील लाँच करेल.
OnePlus 10 Pro साठी तयार केलेल्या पेजनुसार यात हॅसलब्लॅड ब्रँडिंग, फास्ट चार्जर देखील मिळेल. OnePlus 10 Pro भारतात Amazon त्या माध्यामातून लॉन्च होऊ शकतो.
काय खास असेल?
या फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, OnePlus 10 Pro मध्ये Snapdragon 8 Generation 1 चिपसेटसह 12GB LPDDR5 RAM दिली जाईल. हा फोन आउट ऑफ द बॉक्स ColorOS 12.1 वर आधारित Android 12 वर चालेल. स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेट आणि 6.7-इंचाच्या QHD+ डिस्प्लेसह येतो. फोटोग्राफीसाठी, फोनला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये 48-मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 8-मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स असेल. समोर 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. OnePlus 10 Pro ला 80W फास्ट चार्जरसह 5000mAh बॅटरी मिळाली आहे. व्होल्कॅनिक ब्लॅक आणि एमराल्ड फॉरेस्ट कलर व्हेरियंट भारतात लॉंच होतील.
किंमत किती असेल
वनप्लस 10 Pro कदाचित 50 हजारांपेक्षा जास्त किंमतीसह प्रीमियम सेगमेंटला हिट करणार असू शकतो. परंतु ब्रँडचा 8GB मॉडेल देखील असेल की नाही हे पाहणे महत्वाचे असेल. पण ही शक्यता धुसर आहे कारण OnePlus 9RT 5G आणि इतर 9 सीरीजचे डिव्हाईसना याचा फटका बसू शकतो.
TV देखील होऊ शकतो लॉंच
असे बोलले जात आहे की या इव्हेंटमध्ये वनप्लस एक नवीन स्मार्ट टीव्ही देखील सादर करेल. हे अलीकडेच लाँच केलेल्या Y1S चा एक्सटेंशन असल्याचे सांगितले जात आहे. कदाचित, नवीन स्मार्ट टीव्ही Y1S Pro म्हणून ओळखला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.