OnePlus 11 स्मार्टफोन लॉन्च! मिळतो दमदार प्रोसेसर अन् कॅमेरा, जाणून घ्या किंमत

oneplus 11 launched with snapdragon 8 gen 2 100w charging check price specifications marathi news
oneplus 11 launched with snapdragon 8 gen 2 100w charging check price specifications marathi news
Updated on

OnePlus ने शेवटी आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 11 चीनमध्ये 4 जानेवारी 2022 रोजी लॉन्च केला. OnePlus 11 बद्दल माहिती गेल्या अनेक आठवड्यांपासून ऑनलाइन समोर येत होती. OnePlus ने लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्समध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

हा फोन मागील OnePlus 10 Pro चा अपग्रेड व्हेरिएंट आहे. OnePlus 11 मध्ये लेटेस्ट क्वालकॉम मोबाइल चिपसेट स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर, 100W चार्जिंग आणि 16GB पर्यंत RAM सारखे फीचर्स दिले आहेत. नवीन OnePlus 11 ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफीकेशन्सबद्दल सर्वकाही जाणून घेऊयात..

OnePlus 11 ची किंमत

OnePlus 11 चा 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंट 3,999 युआन (सुमारे 48, 300 रुपये) लाँच करण्यात आला आहे. फोनच्या 16 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 4,399 युआन (सुमारे 53,000 रुपये) आणि 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 4899 युआन (सुमारे 59,000 रुपये) आहे.

हा OnePlus स्मार्टफोन Emerald Green आणि Volcanite Black कलर पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. चीनमध्ये या डिव्हाइसची प्री-ऑर्डर सुरू झाली आहे. फोनची विक्री 9 जानेवारीपासून सुरू होणार आहे. दरम्यान Oneplus 11 स्मार्टफोन भारतासह जागतिक बाजारपेठेत 7 फेब्रुवारी रोजी लॉन्च केला जाईल.

हेही वाचा - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

oneplus 11 launched with snapdragon 8 gen 2 100w charging check price specifications marathi news
Mumbai News : IPS देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी नियुक्ती

OnePlus 11 चे स्पेसिफीकेशन्स

OnePlus 11 स्मार्टफोन ग्लास सँडविच डिझाइनसह लॉन्च करण्यात आला आहे. फोन बनवण्यासाठी मेटल फ्रेमचा वापर करण्यात आला आहे. हँडसेट फ्लॅश रेजिस्टंट आहे. OnePlus 11 मध्ये एक अलर्ट स्लाइडर देण्यात आला आहे आणि मागील जेनरेशन फोनच्या तुलनेत त्याच्या कॅमेरा डिझाइनमध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे.

oneplus 11 launched with snapdragon 8 gen 2 100w charging check price specifications marathi news
MSEB News : वीज कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मोठी अपडेट! महावितरणचे ग्राहकांना महत्वाचे आवाहन

फोनमध्ये 6.7 इंचाचा Samsung E4 AMOLED डिस्प्ले दिला आहे. पंच-होल स्क्रीनवर देण्यात आले आहे आणि यामध्ये QHD+ रिझोल्यूशन (3216 x 1440 पिक्सेल) मिळते. डिवाइस मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोनमध्ये VC लिक्विड कूलिंग सिस्टम देखील उपलब्ध आहे आणि फोनमध्ये Android 13 आधारित OxygenOS 13 देण्यात आला आहे. OnePlus 11 मध्ये 12 GB RAM, 16 GB RAM पर्याय दिले आहेत. हँडसेटमध्ये 256 GB आणि 512 GB स्टोरेज पर्याय देण्यात आले आहेत.

oneplus 11 launched with snapdragon 8 gen 2 100w charging check price specifications marathi news
Viral Video : परदेशी पोलिसांनी भारतीय बायकांसोबत धरला ठेका, नेटकरी म्हणाले हा भारत असता तर?

OnePlus 11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो जो Hasselblad ब्रँडिंगसह येतो. फोनला OIS सपोर्टसह 50 मेगापिक्सेल Sony IMX890 प्राइमरी, ऑटोफोकस सपोर्टसह 48 मेगापिक्सेल Sony IMX581 सेकंडरी अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2x टेलिफोटो लेन्ससह 32 मेगापिक्सेल Sony IMX709 RGBW सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()