अनेक कंपन्या त्याचे फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात सादर करत आहेत. बाजारात सॅमसंगने या आधीच फोल्डेबल स्मार्टफोन सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे आणि आता Xiaomi ने देखील अलीकडेच त्याचा प्रीमियम फोल्डेबल फोन लॉंच केला आहे परंतु लवकरच OnePlus देखील या सेगमेंटमध्ये एन्ट्री करणार आहे. एका रिपोर्टनुसार, वनप्लस आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. एका नवीन अपडेटमध्ये, वनप्लसचे सह-संस्थापक पीट लाऊ यांनी शुक्रवारी ट्विटरवर फोल्डेबल स्मार्टफोनच्या डेव्हलपमेंटबद्दल माहिती देण्यासाठी काही खास फोटो शेअर केली. मात्र, नाव आणि इतर तपशीलांबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सॅमसंगने नुकताच आपला नवीन फोल्डेबल फोन लॉन्च केला आहे, तर दुसरीकडे Xiaomi ने अलीकडे Xiaomi Mix Fold 2 सादर केला आहे. Moto Razr 2022 देखील चीनमध्ये दाखल झाला आहे. OnePlus ची सिस्टर कंपनी Oppo ने देखील मागील वर्षाच्या अखेरीस Find N फोल्डेबल सादर करून फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आपली उपस्थिती दर्शवली आहे.
पीट लाऊ यांनी ट्विटरवरफोटो पोस्ट केले. हे फोटो कदाचित आगामी OnePlus फोनची फोल्डिंग स्क्रीन हिंज मेकानिजम असू शकते. कंपनीने कहीही कंन्फर्म केलेले नाही. वनप्लस फोल्ड लवकरच येऊ शकेल असा अंदाज लावला जात आहे.हे Android 13 सह येणार असल्याची अफवा आहे. वनप्लसने अद्याप फोल्डेबलबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.परंतु हे Oppo च्या Find N सारख्या वैशिष्ट्यांसह येऊ शकते जे डिसेंबर 2021 मध्ये लॉन्च केले गेले होते.
Oppo Find N मध्ये काय खास आहे
Oppo Find N मध्ये 120Hz रीफ्रेश रेट आणि 5.49-इंच कव्हर OLED डिस्प्लेसह 7.1-इंच इनवर्ड फोल्डिंग डिस्प्ले दिला आहे. हे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसह 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, Oppo Find N मध्ये 50-मेगापिक्सेलचा Sony IMX766 प्रायमरी सेन्सर, 16-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 13-मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेन्स असलेला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. बाहेरच्या स्क्रीनवर 32MP कॅमेरा, आतल्या स्क्रीनवर 32MP कॅमेरा, 33W SuperWook 4,500mAh बॅटरी वायर्ड चार्जिंग सपोर्टसह मिळतो.
डिस्प्ले सप्लाय चेन कन्सल्टंट्स (DSCC) च्या रिपोर्टनुसार सॅमसंग सध्या फोल्डेबल स्मार्टफोन मार्केटमध्ये वर्चस्व गाजवत आहे .कंपनीने अलीकडेच आपले लेटेस्ट फोल्डेबल स्मार्टफोन Samsung Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 सादर केले आहेत. Huawei, Motorola आणि Xiaomi देखील नवीन फोल्डेबल मॉडेल्स ऑफर करत आहेत. Huawei ने आपल्या Mate X आणि Mate X2 फोल्डेबल स्मार्टफोन्ससह सेगमेंटमध्ये एन्ट्री केली आहे, तर Xiaomi Mix Fold 2 आणि Moto Razr 2022 चा चीनमध्ये नुकताच सादर करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.