OnePlus चे सर्वात स्वस्त इयरबड लॉन्च, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
OnePlus ने आपले बजेट सेगमेंट ऑडिओ प्रॉडक्ट OnePlus Nord Buds CE भारतात लॉन्च केले आहेत. Nord Buds CE हे ब्लूटूथ 5.2 आणि इन-इअर स्टाईल डिझाइनसह कंपनीच्या आजपर्यंतच्या सर्वात कमी किमतीच्या बड्स आहेत. या बड्स 13.4 मिमी टायटॅनियम ड्रायव्हरसह 94ms च्या अल्ट्रा लो-लेटेंसी मोडला सपोर्ट करतात. OnePlus Nord Buds CE मध्ये टच कंट्रोल देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया बड्सची किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.
किंमत किती आहे
वनप्लसच्या Buds CE मूनलाईट व्हाईट आणि मिस्ट ग्रे रंग पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. त्याची किंमत 2,299 रुपये ठेवण्यात आली आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट व्यतिरिक्त कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, OnePlus App Store आणि OnePlus Experience Store वरून 4 ऑगस्टपासून बड्स खरेदी करता येतील.
स्पेसिफिकेशन्स
Nord Buds CE TWS इयरबड्स 13.4mm टायटॅनियम ड्रायव्हरसह बेस्ट साऊंड, डीप BASS आणि 94ms अल्ट्रा-लो-लेटन्सी मोडसह येतात. नॉर्ड बड्स सीई टच कंट्रोल्ससह येतात. नॉर्ड बड्स CE मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी, ब्लूटूथ 5.2, AAC, SBC कोडेक्ससह व्हॉईस असिस्टंट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. BASS आणि Serenade सह बड्समध्ये बॅलन्स्ड इक्वलायझर पर्याय देण्यात आला आहे. कइयरबड्सना स्प्लॅश आणि स्वेट रेजिस्टेंट IPX4 रेटिंग देखील मिळाले आहे.
बॅटरी
OnePlus Nord Buds CE च्या केसमध्ये 300mAh बॅटरी दिली आहे आणि बड्समध्ये 27mAh बॅटरी मिळते. त्याच्या बॅटरीबद्दल, कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्ण चार्ज केल्यावर केससह 20 तासांचा प्लेबॅक मिळतो. 100% चार्जिंगवर इयरबड्स 4.5 तासांचा प्लेबॅक आणि 3 तासांचा टॉकटाइम मिळतो. इअरबड्सचे वजन 3.3 ग्रॅम आहे आणि केस असलेल्या इअरबड्सचे वजन 33 ग्रॅम आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.