तुम्ही जर का नवीन फोन खेरीद करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा कारण, नवीन लीकनुसार OnePlus Nord CE 2 5G हा स्मार्टफोन पुढील महिन्यात लॉन्च होईल असे सांगण्यात आले आहे. कंपनीच्या OnePlus Nord CE 5G चा सक्सेसर मार्चमध्ये OnePlus 10 Pro च्या जागतिक लॉन्चच्या अगोदर, 11 फेब्रुवारी रोजी लॉन्च होईल. OnePlus Nord CE 2 5G देखील ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लॉन्च करण्यात येईल असे संकेत लिकमध्ये देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन भारत आणि युरोपमधील टेस्टींग पुर्ण झाली असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले जात आहे.
प्रख्यात टिपस्टर Max Jambor ने केलेल्या ट्विटनुसार OnePlus Nord CE 2 5G हा स्मार्टफोन 11 फेब्रुवारी रोजी लॉन्च होऊ शकतो, ट्विटमध्ये हँडसेटच्या कॅमेरा मॉड्यूलचे एक सॅम्पल देखील आहे, ज्यावरुन या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. OnePlus ने अद्याप आगामी OnePlus Nord CE 2 5G संदर्भात कोणतेही डिटेल्स उघड केलेले नाहीत, परंतु स्मार्टफोन अलीकडेच कंपनी वेबसाइटच्या सोर्स कोडमध्ये समोर आला आहे.
जुन्या रिपोर्ट्सनुसार, OnePlus Nord CE 2 5G चे कोडनेम Ivan आहे आणि स्मार्टफोन पूर्वी BIS वेबसाइटवर समोर आला होता, ज्याचा मॉडेल क्रमांक IV2201 होता. स्मार्टफोनला 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.4-इंचाचा फुल-एचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. OnePlus Nord CE 2 5G ला MediaTek Dimensity 900 SoC चा सपोर्ट देण्यात येईल, जे 12GB पर्यंत RAM सह जोडलेले असेल.
स्मार्टफोनचे लीक झालेले रेंडरवरून OnePlus Nord CE 2 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनमध्ये 64-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8-मेगापिक्सेलचा सेकंडरी सेन्सर आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देखील असू शकतो, जो होल-पंच डिस्प्लेमध्ये दिला आहे. OnePlus Nord CE 2 5G मध्ये 65W चार्जिंगला सपोर्ट असलेली 4,500mAh बॅटरी देखील देण्यात येईल असे समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.