OnePlus Open : OnePlus ने भारतात लॉन्च केला Foldable Phone, जाणून घ्या फीचर्स,किंमत आणि बरंच काही

भारतात OnePlus Open ची किंमत किती आहे?
OnePlus Open launching Event
OnePlus Open launching Eventesakal
Updated on

OnePlus Open: तुम्हाला OnePlus चा मोबाईल घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे. OnePlus आज भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी OnePlus ओपन फोल्डिंग फोन लॉन्च केला आहे. OnePlus कंपनीचा हा पहिला फोल्डेबल फोन आहे, वनप्लसच्या अधिकृत साइट व्यतिरिक्त, या डिव्हाइससाठी Amazon वर एक वेगळी मायक्रोसाइट देखील तयार करण्यात आली आहे.  

हा हँडसेट भारतासह जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने हा हँडसेट अनेक फ्लॅगशिप फीचर्ससह सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये एक पॉवरफुल Display, Best Triple Rear Camera, 48MP Sony LYT-T808 आहे. वेरिएंट ब्लॅक, व्हाइट आणि emerald forest हा तीन कलर्समध्ये हा फोन उपलब्ध करण्यात आला आहे.

OnePlus Open launching Event
OnePlus Nord CE 3 Lite : 108MP कॅमेरासह वनप्लसचा परवडणारा फोन लाँच; कमी किमतीत मिळतील दमदार फीचर्स

इतर फोल्ड फोन्सप्रमाणे, OnePlus Openमध्ये दोन डिस्प्ले वापरले गेले आहेत, ज्यामध्ये बाह्य डिस्प्ले 6.31Inch आहे, तर जेव्हा अनफोल्ड केला जातो तेव्हा हा फोन 7.82 इंचाच्या डिस्प्लेसह येतो. हा हँडसेट Dual Pro XDR डिस्प्ले सह येतो. हे 2K पॅनेल आहे. याचा रिफ्रेश दर 120Hz आहे आणि त्यात LTPO 3.0 वापरण्यात आला आहे. यात 2800Nits चा पीक ब्राइटनेस डिस्प्ले आहे.

OnePlus Open launching Event
Amazon Sale : OnePlus 11 5G वर 7 हजार रुपयांची प्रचंड सूट! 4 हजार रुपये किमतीचे बड्सही अगदी फ्री

वनप्लस ओपन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो. यामध्ये, कंपनीने बॅक पॅनलवर IOS सह 48MP Sony LYT-T808 CMOS वापरला आहे. इतर दोन कॅमेरे 64-megapixel telephoto आणि 48-megapixel ultra-wide camera  कॅमेरा आहेत.

याबद्दल, कंपनीचा दावा आहे की ते खूप शक्तिशाली फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करू शकते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कंपनीने या हँडसेटच्या कॅमेरा नमुन्याची तुलना इतर अनेक ब्रँडच्या हँडसेटशी केली आहे.

OnePlus Open चा प्रोसेसर

OnePlus च्या या हँडसेटमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. हे 16GB रॅम आणि 512 GB स्टोरेज वापरते. हा हँडसेट सर्व नवीन OxygenOS 13.2 आधारित Android 13 वर काम करेल. या फोनमध्ये 4,805 mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनीचा दावा आहे की हा चार्जर केवळ 42 मिनिटांत 1-100 टक्के चार्जिंग करू शकतो.

OnePlus Open launching Event
OnePlus चा पहिला फोल्डेबल फोन बाजारात, OnePlus Open ची क्रेझ वाढली

भारतात याची किंमत किती आहे?

OnePlus Open ची किंमत 1,39,999 रुपये आहे. त्याचे प्री-बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. भारतात या हँडसेटसोबत बँकिंग ऑफर देखील दिली आहे. ज्यामध्ये 5,000 रुपयांचा झटपट कॅशबॅक मिळेल. यासाठी तुम्हाला ICICI बँक कार्ड आणि Onecard वापरावे लागेल. तसेच, तुम्हाला JioPlus सह 15000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.