OnePlus Summer Launch : वनप्लसचा सर्वांत मोठा लाँच इव्हेंट लवकरच; स्मार्टफोन,टॅब्लेट आणि आकर्षक गॅझेट्स मिळणार अगदी कमी किंमतीत

OnePlus Summer Launch Event : मोबाईल जगतात वेगाने भरारी घेणारी वनप्लस कंपनी पुन्हा एकदा धमाकेदार लाँच इव्हेंट घेऊन येत आहे.
OnePlus Summer Launch Event 2024
OnePlus Summer Launch Event 2024esakal
Updated on

OnePlus : मोबाईल जगतात वेगाने भरारी घेणारी वनप्लस कंपनी पुन्हा एकदा धमाकेदार लाँच इव्हेंट घेऊन येत आहे. 16 जुलै रोजी इटलीच्या मिलानमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात कंपनी चार नवीन गॅझेट्स लाँच करणार आहे.

धातूच्या मजबूत बॉडीसह येणारा हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7+ Gen 3 चिपसेटने चालणार असल्याची चर्चा आहे. 6.74 इंचाचा 120Hz रिफ्रेश रेट असलेला OLED डिस्प्ले आणि 1.5K resolution या फोनची खासियत असेल. अंदाजानुसार, यात 5500mAh क्षमतेची बॅटरी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. 50MP मुख्य लेंस आणि 8MP अल्ट्रावाइड सेन्सर असा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आणि 16MPचा सेल्फी कॅमेरा या फोनमध्ये असण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे वनप्लस कंपनी या फोनला किमान 3 वर्षांचे Android अपडेट्स आणि 4 वर्षांचे सिक्युरिटी पॅचेस देईल अशी अपेक्षा आहे.

OnePlus Summer Launch Event 2024
Airtel Data Leak : एअरटेलने दुसऱ्यांदा विकला ३७ कोटी भारतीयांचा पर्सनल डेटा? हॅकरकडून डेटा लिकच्या पुराव्यांवर कंपनी म्हणाली...

या कार्यक्रमात OnePlus Nord Buds 3 Pro ही इअरबड्सही लाँच होणार आहेत. अंदाजानुसार, या इअरबड्समध्ये वेअर डिटेक्शन, डॉल्बी आणि झेन मोड एअरसारखे अत्याधुनिक फीचर्स असतील. हे इअरबड्स काळे, सोनेरी आणि हिरवा अशा तीन आकर्षक रंगात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

OnePlus Pad 2 आणि OnePlus Watch 2R ही इतर दोन गॅझेट्स देखील या कार्यक्रमात लाँच होण्याची शक्यता आहे. ही गॅझेट्स अलीकडे चीनमध्ये लाँच झालेल्या OnePlus Pad Pro आणि OnePlus Watch 2 यांच्या रिब्रँडेड आवृत्त्या असू शकतात. OnePlus Pad 2 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेट, 12.1 इंचाचा IPS LCD डिस्प्ले, 9150mAh क्षमतेची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट असण्याची शक्यता आहे.

OnePlus Summer Launch Event 2024
Call History : क्षणात मिळवा कुणाचीही कॉल हिस्ट्री! जिओ अन् एअरटेलने आणलं नवीन फिचर,कसं वापरायचं जाणून घ्या

OnePlus Watch 2R या स्मार्टवॉचमध्ये WearOS असू शकते आणि डिझाईन देखील OnePlus Watch 2 सारखेच असू शकते. मात्र, आंतरराष्ट्रीय आवृत्तीमध्ये eSIM सपोर्ट आणि NFCसारखे काही फीचर्स कमी केले जाऊ शकतात.

वनप्लसच्या या लाँच इव्हेंटची अधिकृत घोषणा झाली असून आगामी 16 जुलै रोजी या कार्यक्रमात कंपनी कोणत्या धमाकेदार गॅझेट्स लाँच करते ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.