Online Fraud : सेलमध्ये खरेदी केलेला नवा स्मार्टफोन बनावटी असू शकतो, असा करा चेक

तुम्ही सोप्या पद्धतीने स्मार्टफोन बनावटी आहे की नाही, हे चेक करू शकता.
Online Fraud
Online Fraudsakal
Updated on

ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइट्स दरदिवशी नवनवीन सेलचे ऑफर आणत असतात. या सेलमध्ये काही बंपर ऑफर्ससुद्धा असतात ज्यात भरपूर प्रमाणार डिस्काउंटसुद्धा असतं. त्यामुळे अनेक लोकांना ऑनलाईन शॉपिंग करायला आवडतं.

स्मार्टफोनवरही बरेच ऑफर आणि सेल असतात. विशेष ऑफरच्या सेलमध्ये असलेले स्मार्टफोन्सही अनेकजण खरेदी करतात. पण कधी तुमच्या मनात हा विचार आला की जो फोन तुम्ही सेलमध्ये खरेदी करत आहात तो बनावटी असेल तर... जर तुमच्या मनात अशा प्रकारची शंका निर्माण झाली तर तुम्ही सोप्या पद्धतीने स्मार्टफोन बनावटी आहे की नाही, हे चेक करू शकता. (Online Fraud how can you identify new smart phone is original or not while Online Shopping )

SMS पाठवून करा चेक
डिपार्टमेंट ऑफ टेलीकमुनिकेशनने एक अशी सुविधा दिली आहे की ज्या द्वारे तुम्ही SMS पाठवून फोनविषयी डिटेल्स जाणून घेऊ शकता. याशिवाय तुम्ही C-DOT अॅपद्वारे तुमचा फोन बनावटी आहे की नाही, हे सुद्धा चेक करू शकता.

मॅसेजद्वारे जाणून घेण्यासाठी 14422 नंबर वर एक मॅसेज पाठवा. मॅसेज- KYM (Space) तुमच्या फोनचा 15 अंकांचा IMEI नंबर या मेसेजवर पाठवा. तुम्हाला फोनची सर्व डिटेल्स मिळून जाणार.

Online Fraud
Online Fraud : कुठून सुचतं एवढं? नातवाचा हूबेहूब आवाज काढला अन् वृद्धास लावला 18 लाखांचा चूना

कसा जाणून घ्यायचा IMEI नंबर

IMEI नंबर जाणून घेणे, खुप सोपी आहे. तुम्हाला तुमच्या फोनमध्ये *#06# डायल करा. हे डायल केल्यानंतर तुमच्या फोनच्या स्क्रीनवर एक मॅसेज येणार ज्यामध्ये IMEI नंबर असेल.

याशिवाय एक असा अॅप ही आहे. ज्याद्वारे तुम्ही आपल्या फोनची डिटेल्स जाणून घेऊ शकता. KYM - Know Your Mobile अॅप हा फ्रीमध्ये डाउनलोड करा. हा अॅप तुम्ही प्ले स्टोर किंवा गूगल प्ले स्टोरवरुनही डाउनलोड करू शकता. हा अॅप C-DOT ने स्वत: तयार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.