Open AI Sora creates Music Video : ओपन एआयने काही दिवसांपूर्वी आपलं एआय व्हिडिओ जनरेटर मॉडेल 'सोरा' सादर केलं होतं. केवळ टेक्स्ट इनपुटच्या माध्यमातून एक मिनिट किंवा त्याहून मोठ्या व्हिडिओ क्लिप्स तयार करणारं हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टूल पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. आता सोराने चक्क एक म्युझिक व्हिडिओ बनवून सगळ्यांना आणखी एक धक्का दिला आहे.
ओपन एआय (OpenAI) कंपनीने आपल्या यूट्यूब चॅनलवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या म्युझिक व्हिडिओला काही तासांमध्येच हजारो लाईक्स मिळाले आहेत. कित्येक यूजर्सनी हा एखाद्या स्वप्नाचा व्हिडिओ असल्याचं म्हटलं आहे. सोरा हे केवळ एक व्हिडिओ जनरेटर नाही, तर 'ड्रीम कॅप्चरर' आहे अशी कमेंट एका यूजरने या व्हिडिओवर केली आहे. (SORA Music Video)
सोरा या व्हिडिओ जनरेटर एआय टूलचा अॅक्सेस सध्या काही ठराविक व्यक्तींना देण्यात आला आहे. यातील एक व्यक्ती म्हणजे August Kamp. ऑगस्ट या संगीतकार, रिसर्चर आणि क्रिएटिव्ह आर्टिस्ट आहेत. त्यांनीच हा म्युझिक व्हिडिओ तयार केला आहे. त्या म्हणाल्या, की कलाकारांसाठी सोरा हा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो.
"ही व्हिजुअल्स गेल्या दोन वर्षांपासून केवळ माझ्या मनात होती. मात्र आता सोराच्या मदतीने मी ती लोकांना दाखवू शकते. कलाकारांसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स एक अगदी फायद्याचं टूल ठरू शकतं", असं ऑगस्ट म्हणाल्या.
हा व्हिडिओ जनरेट करण्यासाठी काय प्रॉम्प्ट दिली, किंवा किती व्हिडिओ क्लिप्सचा वापर करण्यात आला याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. हा संपूर्ण म्युझिक व्हिडिओ 2 मिनिटे 19 सेकंदांचा आहे. ओपन एआय हे सध्या सोरामधील सिक्युरिटी इश्यूंवर काम करत आहे. या वर्षीच्या शेवटीपर्यंत सर्वांसाठी सोरा उपलब्ध करण्याचा कंपनीचा मानस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.