OpenAI Bug Bounty Program : शोधा ChatGPT मधील चुका आणि मिळवा 16 लाखांपर्यंतचं बक्षीस

सध्या चॅट जीपीटीची खूप हवा
OpenAI Bug Bounty Program
OpenAI Bug Bounty Programesakal
Updated on

OpenAI Bug Bounty Program : सध्या चॅट जीपीटीची खूप हवा आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची माहिती आपल्याला या साईटवर एका क्लिकवर मिळू शकते. आपले कितीतरी ऑनालाईन टास्कही ही Chatgpt द्वारे पूर्ण करता येतात.

OpenAI Bug Bounty Program
Renault Kiger Car : कायगरची क्रेझ कायम

सायंटिफिक भाषेत Chatgpt ला आपण आर्टिफिशयल इंटेलिजन्स म्हणू शकतो. तरुण आणि तांत्रिक क्षेत्रातील जाणकार आजकाल सोशल साईट्सवर यावर सतत चर्चा करताना दिसत आहे. दरम्यान Chatgpt बनवणाऱ्या कंपनीने आता एक खास OpenAI Bug Bounty प्रोग्राम आणला आहे. ज्याअंतर्गत तुम्हाला लाखो रुपये जिंकण्याची संधी आहे. आतापर्यंत आपण ChatGPT चे अनेक फायदे पाहिले आहेत. पण त्यातील त्रुटी सांगितल्यास कंपनीच बक्षीस देणार आहे.

OpenAI Bug Bounty Program
Technology Tips : सेल्फ ड्राईव्ह कारमध्ये बसलेले बिल गेट्स म्हणाले हा तर कॉम्प्युटर गेम

डेव्हलपर कंपनी OpenAI एक प्रोग्राम चालवत आहे. OpenAI बग बाउंटी प्रोग्राममध्ये, जे लोक कंपनीच्या या प्रणालीतील त्रुटी दाखवतात त्यांना पुरस्कृत केले जाईल. ChatGPT सारख्या कंपनीच्या उत्पादनांमध्ये कोणाला दोष आढळल्यास, त्याला बक्षीस दिले जाईल. कंपनीने प्रत्येक त्रुटी म्हणजेच बगसाठी २०० डॉलर्स (सुमारे १६,४०० रुपये) देण्याची घोषणा केली आहे.

OpenAI Bug Bounty Program
Car Steering Care : तुमच्या कारचं स्टिअरींग सुरळीत काम करतंय का? कसं ओळखायचं, या टिप्स करतील मदत

16 लाख जिंकण्याची संधी

जेव्हा इटलीने डेटा प्रायव्हसीबाबत ChatGPT वर बंदी घातली असताना कंपनीने ही ऑफर आणली आहे. इतर युरोपीय देश देखील जनरेटिव्ह एआय सेवांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे कंपनी आपल्या या तंत्रज्ञानाला आणखी भारी करण्याकरता त्यातील त्रुटी शोधून त्याठिक करण्याच्या दृष्टीने काम करणार आहे. विशेष म्हणजे या OpenAI च्या प्रोग्राममध्ये २०,००० डॉलर्स (सुमारे १६.४ लाख भारतीय रुपये) पर्यंतची रक्कम जिंकली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.