Sam Altman Donation Pledge : दानशूर सॅम अल्टमन! अर्धी संपत्ती करणार दान; बिल गेट्स, इलॉन मस्कच्या पावलावर पाऊल

Open AI CEO Doantion Pledge : संपत्तीचा मोठा हिस्सा समाज कार्यासाठी दान करण्यासाठी घेतली जाते शपथ
Sam Altman and Partner to Donate Most of Their Wealth to Charity
Sam Altman and Partner to Donate Most of Their Wealth to Charityesakal
Updated on

Open AI CEO Announcement : आर्टिफिशियल इंटेलिजन्स संशोधनातील आघाडीची कंपनी OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन यांनी त्यांच्या संपत्तीच्या बहुतांश भागाचे दान करण्याची घोषणा केली आहे. त्यांचे पार्टनर ओलिव्हर मुल्हेरिन यांच्यासोबत मिळून त्यांनी "द गिविंग प्लेज" ही शपथ घेतली आहे. ही शपथ 2010 मध्ये बिल गेट्स, मेलिंडा फ्रेंच गेट्स आणि वॉरेन बफेट यांनी सुरु केली होती.

जगातील सर्वात श्रीमंत लोकांना त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा समाज कार्यासाठी दान करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या शपथेचा उद्देश आहे.

Sam Altman and Partner to Donate Most of Their Wealth to Charity
Electric Scooter Fire : इलेक्ट्रिक स्कूटर वापरताय? गमवावा लागू शकतो जीव ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

18 मे रोजी लिहिलेल्या शपथपत्रात अल्टमन आणि मुल्हेरिन यांनी त्यांच्या यशात योगदान देणाऱ्या लोकांचे आभार व्यक्त केले आहेत. "आम्ही आज या स्थितीपर्यंत पोहोचलो आहोत ते अनेक लोकांच्या कठोर परिश्रम, बुद्धिमत्ता, उदार वृत्ती आणि जग बदलण्याच्या त्यांच्या समर्पणामुळेच शक्य झाले आहे," असे त्यांनी लिहिले आहे.

समाजाची अधिक प्रगती करण्यासाठी आणि लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी समाजाला काहीतरी परत देण्याची, बांधिलकीची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

अल्टमन आणि मुल्हेरिन हे त्यांचे दान विकासाची दिशा बदलणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रात करण्यावर भर देणार आहेत. लोकांसाठी अधिकाधिक संसाधने उपलब्ध करून देऊन समाजाला पुढे नेण्याचा त्यांचा मानस आहे.

जगभरातील समस्यांवर मात करण्यासाठी अनेक श्रीमंत लोकांनी "द गिविंग प्लेज" शपथ घेतली आहे. मॅकेंझी स्कॉट, रीड हॉफमन, मार्क बेनिऑफ, एलॉन मस्क, लॅरी एलिसन आणि मार्क झुकरबर्ग-प्रिसिला चान यांचा यात समावेश आहे.

Sam Altman and Partner to Donate Most of Their Wealth to Charity
Whatsapp Colour Feature : गुलाबी,निळा की जांभळा ? रंगीत होणार व्हॉट्‌सॲपचं चॅट.. लवकरच येतोय नवीन फीचर

अल्टमन यांची विविध क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला फोर्ब्स आणि ब्लूमबर्गच्या श्रीमंत लोकांच्या यादीत स्थान मिळवले आहे. त्यांच्या गुंतवणुकीमध्ये रेडिट आणि स्ट्राईपसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. त्याशिवाय, अणुऊर्जा क्षेत्रातील हेलियन आणि आयुष्य वाढवणारे तंत्रज्ञान असलेल्या रेट्रो बायोसायन्सेस या स्टार्टअप्समध्येही त्यांची गुंतवणूक आहे.

अल्टमन यांनी "द गिविंग प्लेज" शपथ घेऊन संपत्ती आणि प्रभाव समाजाच्या हितासाठी वापरण्याची आपली बांधील इच्छा अधोरेखित केली आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर भर देऊन ते अशा भविष्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत जिथे संसाधने भरपूर संसाधने असतील आणि सर्वांसाठी संधी उपलब्ध असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.