Open AI : ‘ओपनएआय’ कडून आता ‘व्हॉईस क्लोनिंग’

Open AI : सुरक्षेच्या कारणामुळे नवे तंत्रज्ञान सार्वजनिक नाही.
Open AI
Open AIesakal
Updated on

Open AI : ‘चॅटजीपीटी’ या चॅटबॉटची निर्मिती करणारी ‘ओपनएआय’ ही कंपनी आता ‘व्हॉईस असिस्टंट बिझिनेस’मध्ये (ध्वनी सहाय्यक उद्योग) उतरली असून, एखाद्या व्यक्तीचा आवाज क्लोन करू शकणारे तंत्रज्ञान या कंपनीने विकसित केले आहे. जनसुरक्षेच्या कारणास्तव हे तंत्रज्ञान आताच सार्वजनिक करण्यात येणार नाही, असेही कंपनीने सांगितले.

या कंपनीने ‘व्हॉईस इंजिन टेक्नोलॉजी’ची नुकतीच घोषणा केली असून तिच्या नावाच्या अनुषंगाने ‘ट्रेडमार्क’साठी अर्ज देखील केला आहे. कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या आवाजाचे १५ सेकंदांचे रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर संबंधित तंत्रज्ञान त्याच व्यक्तीचा आवाज पुन्हा तयार करू शकते.

या नव्या तंत्रज्ञानाच्या आणखी काही चाचण्या घेण्यात येतील. सध्या या तंत्रज्ञानाचा गैरवापर होण्याचा धोका अधिक आहे. जगभरामध्ये निवडणुकीचे वातावरण असल्याने आम्ही काळजी घेत आहोत असे कंपनीने म्हटले आहे.

Open AI
Open AI Board Members : अल्टमन यांना कंपनीतून काढणाऱ्या तीन जणांची बोर्डावरुन हकालपट्टी; Open AI कंपनीचा मोठा निर्णय

त्या रोबोकॉलची चौकशी

मध्यंतरी अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर शहरामध्ये हजारो नागरिकांना एक रोबोकॉल करण्यात आला होता. त्यात विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आवाजाची नक्कल करण्यात आली होती. सध्या स्थानिक यंत्रणा या प्रकाराची चौकशी करत आहेत. ‘एआय’मध्ये काम करणाऱ्या अनेक स्टार्टअप्सनी याआधीच व्हॉईस क्लोनिंग तंत्रज्ञानाची विक्री सुरू केली असून, हे तंत्रज्ञान काही निवडक उद्योग आणि मनोरंजन क्षेत्रातील स्टुडिओजना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

परवानगीशिवाय क्लोनिंग नाही

‘ओपनएआय’ने याआधीच संबंधित व्यक्तीची परवानगी घेतल्याशिवाय आम्ही तिच्या आवाजाचे क्लोनिंग करणार नाही, असे म्हटले आहे. तसेच क्लोनिंग करण्यात आलेला आवाज हा ‘एआय’च्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे, असेही जाहीर करण्यात येईल, असे म्हटले होते. ‘ओपनएआय’ने तयार केलेला चॅटबॉट आणि ‘डीएएलएल-ई’ या ईमेज जनरेटरने सध्या जगभर धुमाकूळ घातला आहे. ‘सोरा’ हे व्हिडिओ जनरेटरदेखील कंपनीने तूर्त जारी केलेले नाही.

Open AI
Open AI Sora : फक्त स्क्रिप्ट एंटर करा, अन् सिनेमा होईल तयार! 'ओपन एआय'ने केलं खास व्हिडिओ बनवणारं टूल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.