OpenAI New Reasong Model : ओपनएआयने त्यांच्या एआय तंत्रज्ञानात मोठी सुधारणा करत नवीन 'ओपनएआय o1' मॉडेल सादर केले आहे. या मॉडेलची खासियत म्हणजे हे जटिल,किचकट गणितीय आणि वैज्ञानिक प्रश्न सोडवण्यासाठी अधिक वेळ न घेता, अगदी माणसासारखे विचार करून उत्तर देते. हे मॉडेल ज्या पद्धतीने विचार करते, ती प्रक्रिया त्याच्या आधीच्या मॉडेल्सपेक्षा अधिक प्रगत आहे. गणित, कोडिंग आणि विज्ञानात याने उच्च कामगिरी केली असून, इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाडमध्ये याने 83% अचूकतेने समस्या सोडवल्या आहेत.