Oppo a3x Launch : हे काय नवीन! मार्केटमध्ये आला आयफोनसारखा Oppo a3x,कमाल फीचर्स अन् किंमत चक्क १० हजारपेक्षा कमी

OPPO A3x Launches with iPhone-Like mobile Look Under 10,000 Rupees : दिवाळीच्या निमित्ताने ओप्पोने एक नवीन बजेट स्मार्टफोन बाजारात आणला आहे, जो 10,000 रुपयांच्या आत उपलब्ध आहे.
OPPO A3x Launches with iPhone-Like mobile
OPPO A3x Launches with iPhone-Like mobile Look Under 10,000 Rupeesesakal
Updated on

Oppo a3x Mobile Launch Price Fetures : दिवाळीच्या निमित्ताने ओप्पोने एक नवीन बजेट स्मार्टफोन बाजारात आणला आहे, जो 10,000 रुपयांच्या आत उपलब्ध आहे. OPPO A3x हे नाव असलेला हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो - 64GB आणि 128GB. क्वालकॉम प्रोसेसरने सुसज्ज असलेल्या या फोनमुळे ग्राहकांना कमी किमतीत चांगला स्मार्टफोन घेण्याची एक उत्तम संधी मिळणार आहे.

आकर्षक डिझाइनसह बजेटमध्ये आयफोनचा अनुभव

OPPO A3x च्या डिझाइनमध्ये आयफोनसारखीच झलक दिसून येते, विशेषतः त्याच्या रियर कॅमेरा मॉड्यूलमध्ये. त्यामुळे प्रीमियम लूक असलेला स्टायलिश फोन कमी किंमतीत घेण्याची संधी मिळत आहे. या फोनला IP54 रेटिंग मिळाली आहे, ज्यामुळे तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे, हे बजेट फोनसाठी एक विशेष फीचर आहे.

व्हेरिएंट्स आणि किंमत

OPPO A3x दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

  • 4GB RAM + 64GB स्टोरेज, किंमत: 8,999 रुपये

  • 4GB RAM + 128GB स्टोरेज, किंमत: 9,999 रुपये

OPPO A3x Launches with iPhone-Like mobile
Elon Musk Wikipedia : आता पुरे झालं! विकिपीडियाला देणग्या देणं बंद करा; असं का म्हणाले इलॉन मस्क,नेमकं प्रकरण काय?

हे दोन्ही व्हेरिएंट दोन रंगांमध्ये येतात - नेब्युला रेड आणि ओशन ब्लू. हा स्मार्टफोन ओप्पोच्या ई-स्टोअर, Amazon आणि Flipkart वरून खरेदी करता येईल.

OPPO A3x ची खास वैशिष्ट्ये

  • 6.67-इंचाचा डिस्प्ले, 1604 x 720 पिक्सेल रिझोल्यूशनसह मिळत आहे.

  • 1000 निट्स ब्राइटनेस आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे.

  • Android 14 वर ColorOS 14 सिस्टीमसह उपलब्ध आहे.

  • Qualcomm Snapdragon 6s चिपसेट, जो दैनंदिन कामांसाठी चांगले आहे.

OPPO A3x Launches with iPhone-Like mobile
Mobile Recharge Price Down : खुशखबर! लवकरच मोबाईल रिचार्जचे दर होऊ शकतात कमी; नेमकं कारण काय? जाणून घ्या

फोटोग्राफीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप, जो या किंमतीत चांगल्या फोटोग्राफीचा अनुभव देण्याची हमी देतो. यंदाच्या दिवाळीत स्मार्टफोन खरेदीसाठी हा एक उत्तम पर्याय ठरेल.

जर तुम्हाला या सणासुदीच्या काळात बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर OPPO A3x हा नक्कीच एक विचार करण्यासारखा पर्याय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.