Oppo A79 5G : ओप्पोने लाँच केला नवीन मिड-बजेट स्मार्टफोन! 8 जीबी रॅम, एआय कॅमेरा अन् भन्नाट फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच मोठा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे.
Oppo A79 5G
Oppo A79 5GeSakal
Updated on

चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोने काही दिवसांपूर्वी एक प्रीमियम रेंजचा फ्लिम स्मार्टफोन लाँच केला होता. यानंतर आता मिड-बजेट रेंजचा एक स्टायलिश स्मार्टफोन देखील कंपनीने लाँच केला आहे. Oppo A79 5G असं या स्मार्टफोनचं नाव आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच मोठा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. यात सेल्फीसाठी पंच होल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 8 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज ऑप्शन देण्यात आला आहे.

Oppo A79 5G
Oppo Find N3 Flip : ओप्पोने भारतात लाँच केला स्टायलिश फ्लिप फोन; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

ओप्पो ए79 फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर मागच्या बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 50MP क्षमतेचा आहे. यामध्ये एआय सेन्सर दिला आहे. तर सेकंडरी कॅमेरा 2MP क्षमतेचा पोर्ट्रेट कॅमेरा आहे.

या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक 6020 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच, यामध्ये 5,000 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनचे दोन कलर व्हेरियंट सादर करण्यात आले आहेत.

Oppo A79 5G
Apple Event : 30 ऑक्टोबरला पार पडणार अ‍ॅपलचा 'स्केरी फास्ट' इव्हेंट! यावेळी काय होणार लाँच?

या स्मार्टफोनची किंमत 19,999 रुपये आहे. मात्र, यावर बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टवरुन ठराविक बँकांचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरल्यास यावर 4 हजारांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो. तसंच, यामध्ये नो कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे. जुना ओप्पोचा फोन एक्सचेंज केल्यास देखील 4,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()