Oppo Smartphone Launch: लाँच झाला ओपोचा मिड रेंज स्मार्टफोन; AIची जोड अन् भन्नाट फीचर्स, इतक्या कमी किंमतीत कुठेच नाही

Mobile Buying Tips : भारतात Oppo चा धूमधडाका सुरूच आहे. कंपनीने नुकतेच Reno 12 आणि Reno 12 Pro हे दोन जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच केले आहेत.
Oppo Reno 12 Series Now Available in India Prices, Specifications, and Offers
Oppo Reno 12 Series Now Available in India Prices, Specifications, and Offerseaskal
Updated on

Mobile Buying Guide : भारतात Oppo चा धूमधडाका सुरूच आहे. कंपनीने नुकतेच Reno 12 आणि Reno 12 Pro हे दोन जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ही सीरीज फ्लॅगशिप फोन असल्यासारखे फीचर्स आणि आकर्षक डिझाईन मिड-रेंज किंमतीत (Rs 32,999) उपलब्ध करून देते आहे. या फोनमध्ये कोणती खास वैशिष्ट्ये आहेत आणि तुमच्यासाठी कोणता फोन बेस्ट आहे ते जाणून घ्या.

एआय फीचर्स आता मिड-रेंजमध्ये

Reno 12 सीरीजची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यामधील एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) फीचर्स. आतापर्यंत फक्त महागड्या फोनमध्येच असलेले अत्याधुनिक एआय फीचर्स Oppo आता मिड-रेंज सेगमेंटमध्ये घेऊन येत आहे. AI Clear Face, AI Writer, AI Recording Summary, आणि AI Eraser 2.0 सारखे फीचर्स वापरून तुम्ही तुमचे फोन वापरण्याचे अनुभव अधिक स्मार्ट आणि सोयीस्कर बनवू शकता.

Oppo Reno 12 Series Now Available in India Prices, Specifications, and Offers
5G Network : तुमच्या स्मार्टफोनच्या 4G नेटवर्कला चुटकीसरशी बनवा 5G; सेटिंगमध्ये लगेच करा 'हे' बदल

जबरदस्त डिस्प्ले आणि परफॉर्मन्स

दोन्ही फोनमध्ये 6.7 इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे जो 120Hz चा रिफ्रेश रेट आणि 1200 nits ची पीक ब्राइटनेस देतो. Reno 12 Pro मध्ये Corning Gorilla Glass Victus 2 ची तर बेस मॉडेलमध्ये Gorilla Glass 7 ची प्रोटेक्शन आहे. MediaTek Dimensity 7300-Energy चिप आणि 80W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट या फोनच्या जबरदस्त परफॉर्मन्सची हमी देतात. 5000mAh ची बॅटरी चार वर्षांपर्यंत टिकणारी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Oppo Reno 12 Series Now Available in India Prices, Specifications, and Offers
Nokia 5G Launch : नोकियाची धमाकेदार एन्ट्री! या 5G कीपॅड स्मार्टफोनची एक झलक तुम्हाला मोहून टाकेल; जाणून घ्या फीचर्स अन् आकर्षक किंमत

कॅमेरा

Reno 12 Pro मध्ये 50MP मेन कॅमेरा (Sony IMX766 sensor) आणि 50MP टेलिफोटो कॅमेरा (Samsung JN5 sensor) आहे. यामुळे तुम्ही हाई क्वालिटी फोटो आणि व्हिडिओ काढू शकता. सेल्फीसाठी 50 MP चा जबरदस्त कॅमेरा आहे.

Reno 12 मध्ये प्रोच्या टेलिफोटो कॅमेऱ्याच्या जागी 2MP macro sensor आहे जो अगदी जवळच्या गोष्टींचे फोटो काढण्यासाठी उपयुक्त आहे. सेल्फीसाठी यामध्ये 32MP चा कॅमेरा आहे.

Oppo Reno 12 Series Now Available in India Prices, Specifications, and Offers
Pegasus Spyware Attack : तुमचा आयफोन आहे स्पायवेअरच्या जाळ्यात! एक चूक अन् आयफोन होऊ शकतो हॅक; कंपनीने भारतासह ९७ देशांना दिली चेतावणी

किंमत आणि उपलब्धता

Oppo Reno 12 ची किंमत Rs 32,999 (8GB RAM + 256GB स्टोरेज) आहे तर Reno 12 Pro ची किंमत Rs 36,999 (12GB RAM + 256GB स्टोरेज) आहे. टॉप मॉडेल (12GB RAM + 512GB स्टोरेज) ची किंमत Rs 40,999 आहे. दोन्ही फोन 25th July पासून Oppo च्या ऑफिशियल वेबसाइट, Flipkart आणि इतर रिटेल स्टोर्सवर उपलब्ध असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.