Oppo Reno 7 Pro 5G ची विक्री (Sale) 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 39,999 रुपये आहे. फोनच्या पहिल्या सेलमध्ये कंपनी अनेक ऑफर्ससह हा फोन खरेदी करण्याची संधी देणार आहे. यामध्ये 4,000 रुपयांपर्यंतची इंस्टंट डिस्काउंट आणि कॅशबॅकसह एक्सचेंज बोनस यासारख्या अनेक ऑफरचा समावेश आहे. फ्लिपकार्ट व्यतिरिक्त, फोन ऑफलाइन रिटेलर्सकडून देखील खरेदी केला जाऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया फोनच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदीवर तुम्हाला किती फायदा होऊ शकतो.
ऑनलाइन खरेदी केल्यास
जर तुम्ही हा फोन ऑनलाईन खरेदी केला तर तुम्हाला 4 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या डिस्काउंटसाठी, तुम्हाला अॅक्सिस बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक किंवा बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डद्वारे पैसे द्यावे लागतील. त्याच वेळी, एचडीएफसी बँकेच्या कार्डांवर पेमेंट केल्यावर तुम्हाला 2 हजार रुपयांपर्यंतचा इंस्टंट डिस्काउंट देखील सूट मिळू शकतो. तुम्ही या बँक कार्डांवर 6 महिन्यांच्या फ्री EMI वर फोन देखील खरेदी करू शकता. याशिवाय तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेतल्यास जुन्या फोनवर तुम्हाला 4,000 रुपयांची एडिशनल सूटही मिळू शकते. एवढेच नाही तर कंपनी लॉन्च ऑफर अंतर्गत युजर्सना Oppo नेकबँड 1399 रुपयांमध्ये ऑफर करणार आहे.
ऑफलाइन खरेदीवर ऑफर
जरी तुम्ही ऑफलाइन स्टोअरमधून फोन विकत घेतला तरीही तुम्हाला अनेक उत्तम ऑफर्स मिळतील. ICICI बँक, कोटक बँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक व्यतिरिक्त, तुम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला ऑफलाइन स्टोअरवर 4,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकता. याशिवाय, फोन बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि कोटक बँक यांच्याकडून 'इझी टू ओन फायनान्स स्कीम' ऑफर अंतर्गत देखील खरेदी केला जाऊ शकतो.
तुम्ही Oppo अपग्रेड स्कीम अंतर्गत फोन देखील खरेदी करू शकता. या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही 12 महिन्यांच्या वापरानंतर फोन परत करू शकता आणि त्या बदल्यात तुम्हाला 70% बायबॅक मिळेल. कंपनीच्या काही मेनलाइन स्टोअर्सवर, Oppo वापरकर्त्यांना Oppo पॉवर बँक 30W फक्त 1 रुपयात मिळेल, ज्याची किंमत 1999 रुपये आहे
Oppo Reno 7 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये कंपनी 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले देत आहे. 12 GB रॅम असलेल्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 1200 Max चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.