Automobile Sector : ऑटोमोबाईल क्षेत्रात गुंतवणुकीसाठी ऑपर्च्युनिटी फंड

एसबीआय म्यूचअल फंडाने हा प्लॅन बाजारात आणल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रातील नवी क्षितिजे समोर आणली आहेत.
Automobile Sector
Automobile Sectoresakal
Updated on

सोलापूर ः देशातील ऑटोमोबाईल उद्योगाची वाढती प्रगती लक्षात घेत एसबीआय ऑटोमोबाईल ऑपर्च्यूनिटीज फंडाने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधणारा प्लॅन बाजारात आणला आहे. एसबीआय म्यूचअल फंडाने हा प्लॅन बाजारात आणल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रातील नवी क्षितिजे समोर आणली आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्राची वाढती प्रगती लक्षात घेत त्यावर आधारित गुंतवणूक पुढील काळात उत्तम परतावा देणारी ठरेल अशा पद्धतीने या प्लॅनची मांडणी करण्यात आली. पुढील काळात सर्वाधिक वेगाने प्रगती करणारे क्षेत्र असेल. ज्याची निर्यात देखील पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे.

Automobile Sector
Accident News : पाथरी तालुक्यातील हादगाव शिवारात कार दुचाकीचा समोरासमोरधडक; एकाच्या मृत्यूनंतर अज्ञातानी जाळली कार

ऑटोमोबाईल क्षेत्राची प्रगती

- जगात ४ थ्या क्रमांकाची ऑटोमोबाईल बाजारपेठ भारतात

- जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ऑटोमोबाईल उत्पादनांचा देश

- देशाच्या जीडीपी मध्ये ऑटोमोबाईल क्षेत्राचा वाटा ७.१ टक्के

- ऑटो ॲन्सिलरी क्षेत्राची उलाढाल ६९.७० बिलियन डॉलर

Automobile Sector
Nandurbar News : वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या शहरातील 27 व्यावसायिकांवर कारवाई

नव्या संधी

- देशात १००० व्यक्तीमागे ३४ कार असून हे प्रमाण वाढणार आहे.

- वर्ष २०२९ पर्यंत ऑटोमोटिव्ह उद्योग १८८ बिलियन डॉलरपर्यंत वाढणार

- इलेक्ट्रीक वाहन बाजार ३७.६ बिलियन डॉलरपर्यंत वाढणार

- वाहन कर्जाचा बाजार प्रौढ वयोगटापासून विद्यार्थ्यांपर्यंत विस्तारित

- सरकारी धोरणे ऑटोमोबाईल क्षेत्राच्या वाढीस अनुकूल

Automobile Sector
Dhule News: पाऊस तोंडावर, नाले मात्र ‘ब्लॉक’च! धुळे शहरातील काही नाल्यांची स्थिती; प्राधान्यक्रमाने नालेसफाईला वेग देण्याची गरज

प्लॅनची वैशिष्ट्ये

- निधी व्यवस्थापक म्हणून तन्मय देसाई यांची नियुक्ती

- किमान ५ हजार रुपयापासून गुंतवणूक

- किमान मासिक एसआयपी ५०० रुपये

- मुळ उपकरणे उत्पादक, ऑटो उत्पादन घटक, इलेक्ट्रीक उद्योग व संभाव्य

- निर्यातीच्या मुद्द्यावर गुंतवणूक

सध्या भारतात फक्त ४ टक्के लोकांकडे चारचाकी आहेत. ज्या पद्धतीने देशात वाहतुकीचे इन्फ्रास्ट्रक्चर विकास झाला आहे. ते पाहता निश्चितपणे ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या विकासाच्या संधी असणार आहेत. त्यामुळे हा प्लॅन सकारात्मक असून अधिक परतावा देणारा ठरेल.

- अविनाश बोरगावकर, म्युचअल फंड सल्लागार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.