पॅन अन् आधार लिंक करताना माहिती चुकलीये? अशी करा दुरुस्त

आधार आणि पॅनमध्ये माहिती जुळत नसल्यास लिंक कसे करायचे ते जाणून घ्या
Pan Card and Aadhaar Card
Pan Card and Aadhaar Cardesakal
Updated on
Summary

आधार आणि पॅनमध्ये माहिती जुळत नसल्यास लिंक कसे करायचे ते जाणून घ्या

पॅन आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. तुम्ही अजूनही तुमचा पॅन आणि आधार लिंक (Pan and Aadhaar Link) केले नसेल, तर आयकर विभाग (Income tax department) तुमचे पॅन कार्ड रद्द करू शकते. यासोबतच तुम्हाला दंडही होऊ शकतो. अशा परिस्थितीत आधार आणि पॅन कार्ड लिंकिंग लवकरात लवकर व्हायला हवे. आधार आणि पॅनमधील माहिती जुळत नसल्यामुळे अनेकांना लिंक करण्यात अडचणी येत आहेत. तुमच्याही बाबतीत असे होत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आधार आणि पॅनमध्ये माहिती जुळत नसल्यास लिंक कसे करायचे ते जाणून घ्या.

Pan Card and Aadhaar Card
आता प्रत्येकसाठी एकच Digital ID; पॅन, आधार, पासपोर्टसह DL होणार लिंक

आधार-पॅनचे फायदे - आधार कार्डद्वारे सरकारच्या सर्व योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात. वन नेशन वन रेशन कार्ड असो की पीएम किसान सन्मान निधी किंवा अंत्योदय अन्न योजना, या सर्व योजनांचा लाभ लोकांपर्यंत फक्त आधार कार्डद्वारेच पोहोचला आहे. त्याचबरोबर बँक, पेन्शन, रेल्वेसह अन्य सरकारी खात्यांमध्येही आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून केला जात आहे.

दुसरीकडे, पॅन कार्ड मोठे आर्थिक व्यवहार करण्यासाठी आणि आयकर रिटर्न भरण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर बँकेकडून कर्ज घेण्यात पॅनकार्डचाही मोठा वाटा आहे. अशा स्थितीत ही दोन्ही कागदपत्रे अनेकदा रोजच्या कामात वापरली जातात.

Pan Card and Aadhaar Card
पॅन-आधार लिंक करण्याबाबत नवीन अपडेट, सेबीकडून विशेष सूचना

आधार कार्ड जारी करणारी संस्था युनि आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)नुसार, जन्मतारीख, लिंग, नाव, वडील/पतीचे नाव पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी जुळले पाहिजे. यापैकी कोणतीही माहिती जुळत नसल्यास, तुमचा आधार आणि पॅन लिंक होणार नाही. तुमच्यासोबतही अशीच अडचण असेल, तर त्यासाठी तुम्हाला आधार किंवा पॅन कार्डपैकी एकामध्ये दिलेली चुकीची माहिती दुरुस्त करावी लागेल.

चूक सुधारण्यासाठी या गोष्टी करा - जर पॅन किंवा आधारमध्ये काही चूक असेल तर ती सुधारता येईल. पॅन कार्डमधील चूक सुधारण्यासाठी तुम्हाला onlineservices.nsdl या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. दुसरीकडे, आधार कार्डमधील चूक सुधारण्यासाठी, तुम्हाला UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.