18 वर्षांपेक्षा कमी वय असेल तरी बनवू शकता पॅन कार्ड, पाहा प्रोसेस

pan card can also be made for those who are under 18 years of-age know process to how to apply
pan card can also be made for those who are under 18 years of-age know process to how to apply esakal
Updated on

फायनान्सशी संबंधित कोणत्याही कामासाठी पॅन कार्ड (PAN Card) आवश्यक डॉक्युमेंट असते. आयटीआर (ITR) भरण्यापासून ते डिमॅट खाते उघडण्यापर्यंत त्याची गरज पडते. पॅनकार्डशिवाय तुमची अनेक कामे अडकू शकतात. त्यामुळेच पॅनकार्ड अगोदर बनवून घेणे योग्य ठरते. सामान्यतः लोकांना 18 वर्षांनी पॅन कार्ड बनवले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की, वयाच्या18 वर्षा पुर्ण होण्यापूर्वीच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.

तुम्ही तुमच्या मुलाच्या पॅन कार्डसाठी देखील अर्ज करू शकता. कोणताही अल्पवयीन व्यक्ती थेट पॅन कार्डसाठी अर्ज करू शकत नाही. यासाठी मुलाचे पालक त्यांच्या वतीने अर्ज करू शकतात.

ही प्रोसेस करा फॉलो

  • पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम NSDL च्या वेबसाइटला (https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html) भेट द्या.

  • या नंतर, अर्जदाराची योग्य कॅटेगरी निवडून सर्व वैयक्तिक माहिती भरा.

  • आता अल्पवयीन मुलाचे वय प्रमाणपत्र आणि पालकांच्या फोटोसह इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

  • या प्रोसेस दरम्यान, फक्त पालकांची स्वाक्षरी अपलोड करा.

  • 107 रुपये फी भरल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट करा.

  • त्यानंतर तुम्हाला एक पावती क्रमांक मिळेल, तुम्ही त्याचा वापर करून अर्जाचे स्टेटस जाणून घेऊ शकता.

  • अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक मेल येईल.

  • पॅन कार्ड यशस्वी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत तुमच्यापर्यंत पोहोचेल.

pan card can also be made for those who are under 18 years of-age know process to how to apply
'हिजाब न घातल्याने महिलांवर बलात्कार होतो', काँग्रेस नेत्याचे वक्तव्य

ही कागदपत्रे तयार ठेवा

  • पॅन कार्ड अर्ज करण्यासाठी अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते.

  • अल्पवयीन मुलाच्या पालकांचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा आवश्यक असेल.

  • अर्जदाराचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा देखील आवश्यक आहे.

  • ओळखीचा पुरावा म्हणून, अल्पवयीन व्यक्तीच्या पालकांना आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे लागेल

  • पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, पोस्ट ऑफिस पासबुक, मालमत्ता नोंदणीची कागदपत्रे किंवा मूळ रहिवासी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

pan card can also be made for those who are under 18 years of-age know process to how to apply
येतेय महिंद्राची इलेक्ट्रिक कार; आनंद महिंद्रांनी रिलीज केला टीझर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.