Password Vs Passkey :आता Password लक्षात ठेवण्याची कटकटच नको; Passkey करेल मदत

पासवर्ड विसरला तरी काहीच प्रॉब्लेम नाही
Password Vs Passkey
Password Vs Passkeyesakal
Updated on

Password Vs Passkey : Password हा आपल्या सर्वांसाठी परिचित शब्द आहे. हे कोणत्याही Account च्या सुरक्षेसाठी आहे. त्याशिवाय सोशल मीडिया, नेटबँकिंग सारखी खाती वापरता येत नाहीत. पण हल्ली आणखी एक शब्द खूप लोकप्रिय होऊ लागला आहे. तो म्हणजे Passkey. असे म्हटले जात आहे की लवकरच अशी वेळ येईल. जेव्हा Password ची जागा Passkey घेईल. पण शेवटी ही Passkey काय आहे आणि ती कशी काम करते याबद्दल जाणून घेऊया.

Passkey ही एक प्रणाली आहे जी आपल्याला Password शिवाय कोणत्याही साइटवर लॉगिन करण्याची परवानगी देते. खरे तर ते बायोमेट्रिक्सवर आधारित असून आता Password ला पर्याय म्हणून याकडे पाहिले जात आहे. खाते अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी Passkey क्रिप्टोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर करते.

Password Vs Passkey
WEAK Passwords : तुमचे पासवर्ड्स आत्ताच बदला ! हे काही पासवर्ड्स चटकन होतात हॅक

विशेष म्हणजे पॉवरवर्डप्रमाणेच कॅरेक्टर लक्षात ठेवण्याचा त्रास होत नाही आणि युजर्स आपल्या डिव्हाइसमधून Passkey सहज वापरू शकतात. Passkey तयार करण्यासाठी Web ऑथेंटिकेशनचा वापर केला जातो.

Passkey दोन स्टेप्ससह येते एक म्हणजे Public key आणि Private Key. हे सार्वजनिक वेबसाइटवर संग्रहित केले जाते, तर खाजगी की वापरकर्ता डिव्हाइसवर संग्रहित केली जाते.

ज्या वेबसाइट्स आणि अॅप्समध्ये हे फिचर देण्यात आले आहे. म्हणजेच ज्यावर Passkey सपोर्टेड आहे. त्या वेबसाइट्स आणि अॅप्सवरच Passkeyचा वापर करता येऊ शकतो.

Password Vs Passkey
Forgot password of phone : फोनचा पासवर्ड विसरलात ? अशाप्रकारे अनलॉक करा फोन

यासाठी आधी तुम्हाला लॉक सेट करावा लागेल. यानंतर साइन इन केल्यावर गुगल क्रोम आपोआप ऑटो-फिल फीचर चा वापर करेल आणि तुम्हाला Password  टाकण्याची गरज भासणार नाही.

Apple चाही Support

Appleने IOS 16 लाँच करताना आयफोनसाठी Passkey लागू केली आहे. iPhone वर टच ID आणि फेस ID Passkey चा वापर करता येईल. विंडोज वापरकर्ते मायक्रोसॉफ्टच्या विंडोज हॅलोचा वापर करून विंडोज 10 आणि 11 मध्ये Passkey वापरू शकतात. त्याचप्रमाणे क्रोम, एज, फायरफॉक्स, सफारी सारखे अनेक वेब ब्राउजर Passkey सपोर्टसह येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()