Female-Friendly Travel : महिलांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित आणि आरामदायक; 'या' अ‍ॅपने लाँच केलं खास फीचर

Paytm Bus Booking : पेटीएमचं हे फीचर आता सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. यामुळे महिलांना सुरक्षित प्रवास करता येईल असा दावा कंपनीने केला आहे.
Female-Friendly Travel
Female-Friendly TraveleSakal
Updated on

Paytm Female-Friendly Travel Feature : आजकाल कित्येक लोक प्रवासासाठी ऑनलाईन तिकीट बुक करण्याला प्राधान्य देतात. अशा वेळी आपल्यासमोर बसचं नाव, रेटिंग आणि सुविधांची माहिती असते. मात्र एखादी बस महिलांसाठी कितपत सुरक्षित आहे याबाबत अ‍ॅपवर माहिती मिळू शकत नाही. याच समस्येवर उपाय म्हणून पेटीएमने नवीन फीचर लाँच केलं आहे.

कसं आहे फीचर?

पेटीएमचं हे फीचर आता सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. यामुळे महिलांना सुरक्षित प्रवास करता येईल असा दावा कंपनीने केला आहे. फीमेल-फ्रेंडली ट्रॅव्हलसाठी असलेलं हे फीचर कसं काम करतं, जाणून घेऊया.

  • पेटीएम अ‍ॅपमध्ये बस तिकीट बुक करताना हे फीचर अ‍ॅक्टिव्हेट होईल.

  • यामध्ये महिलांनी त्या बसला दिलेल्या रेटिंग्स वेगळ्या दिसतील. सोबतच, महिलांनी दिलेल्या प्रतिक्रिया देखील दिसतील. (Bus Ratings)

  • यामध्ये बस सिलेक्ट करताना नवीन फिल्टर देण्यात येईल. 'Most Booked by Female' असा हा फिल्टर असणार आहे. यामुळे इतर महिलांनी निवडलेल्या बसेस निवडता येतील.

  • फीमेल फेव्हरेट (Female Favorite) हादेखील पर्याय यामध्ये देण्यात आला आहे. यामुळे कोणत्या बसेसना महिलांची अधिक पसंती मिळत आहे हे स्पष्ट होईल.

  • यामध्ये तुम्ही देखील आपला अनुभव इतरांसोबत शेअर करू शकता. यामुळे इतर महिलांना याचा फायदा होईल आणि त्या अधिक सुरक्षित तसंच कम्फर्टेबल प्रवास करू शकतील. (Most Selected by Females)

Female-Friendly Travel
Truecaller AI Safety : 'एआय'च्या मदतीने स्पॅम कॉल्सना बसणार आळा; ट्रुकॉलरने लाँच केलं नवीन सेफ्टी फीचर

पेटीएमने आपल्या वेबसाईटवर असा दावा केला आहे, की अशा प्रकारची सुविधा पुरवणारे ते पहिलेच ऑनलाईन ट्रॅव्हल अ‍ॅग्रिगेटर आहेत. ठराविक मार्गांवर महिला प्रवास करताना कोणत्या बस प्रोव्हाईडर्सना प्राधान्य देत आहेत याची माहिती इतर महिलांना कळावी हा या सुविधेचा उद्देश्य आहे असंही पेटीएमने स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.