आता मोबाईल वॉलेट पेटीएम मोबाईल रिचार्जवर अधिकचा कर आकारत आहे. हा अधिकचा कर पेटीएम वॉलेट बॅलन्स किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) किंवा बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड सारख्या सर्व पेमेंटवर लावला जात आहे. (Paytm started charges on extra rupees for mobile recharges)
नेहमीच डिजिटल वॉलेट पेमेंट लोकांना अनेक सुविधा पुरवते. पण आता डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमने (Paytm) यूजर्सला मोठा झटका दिला आहे. तुम्ही तुमच्या पेटीएम खात्यातून कोणतही मोबाइल रिचार्ज केल्यास तुम्हाला अधिकचा कर भरावा लागणार आहे. वास्तविक आता मोबाईल वॉलेट पेटीएम मोबाईल रिचार्जवर अधिकचा कर आकारत आहे.
हा अधिकचा कर पेटीएम वॉलेट बॅलन्स किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) किंवा बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड सारख्या सर्व पेमेंटवर लावला जात आहे. तो 1 ते 6 रुपयांच्या दरम्यान असू शकतो.
Phone-Pe ने पेटीएम वरून मोबाईल रिचार्जवर अधिकचा कर आकारण्यास आधीच सुरुवात केली आहे. पेटीएम सध्या ज्या ग्राहकांकडुन अधिकचा भार आकारत आहे. ते आपल्याला रिचार्ज करताना अधिकभाराच्या सुचना आधीच देत आहे.
त्याच वेळी ट्विटरवरील अनेक पेटीएमच्या ग्राहकांनी असा दावा केलाय की डिजिटल वॉलेट पेमेंटने सुविधा शुल्क म्हणून अधिकभार आकारण्यास सुरुवात केली आहे. कृपया लक्षात घ्या की हा अधिकभार रु. 100 वरील सर्व व्यवहारांवर लागू आहे.
पेटीएम आपला महसूल वाढवण्यासाठी ग्राहकांकडून अधिकभार आकारत आहे. 2019 मध्ये, पेटीएमने ट्विटरवर एक पोस्ट केली होती की ते UPI आणि वॉलेटसह कोणत्याही प्रकारच्या पेमेंटवर ग्राहकांकडून कोणतीही सुविधाकर किंवा व्यवहार शुल्क आकारणार नाही.
Paytm प्रमाणे, PhonePe ने अगोदर ऑक्टोबरमध्ये अधिकभार आकारण्यास सुरुवात केली.अजुनपर्यंत PhonePe आणि Paytm या दोघांकडून ते कोणत्या कारणास्तव अधिकभार आकारत आहेत. याची पुष्टी होऊ शकली नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.