Mobile Hacking : घ्या! आता PDF फाईल डाऊनलोड केलं तरी होऊ शकतो फोन हॅक; खबरदारी घेण्याचं आवाहन

PDF Malware : ग्लोबल सायबर सिक्युरिटी फर्म असलेल्या पालो अल्टो नेटवर्कने याबाबत माहिती दिली आहे.
PDF File Hacking
PDF File HackingeSakal
Updated on

तंत्रज्ञान ज्या वेगाने प्रगती करत आहे, त्याच वेगाने गुन्हेगार देखील नवनवीन पद्धतींचा वापर करत आहेत. आतापर्यंत तुम्ही एखाद्या इंटरनेट लिंकच्या माध्यमातून फोन किंवा कम्प्युटर हॅक झाल्याचं ऐकलं असेल. मात्र, आता चक्क पीडीएफ फाईलच्या माध्यमातूनही हॅकर्स आपल्या डिव्हाईसचा ताबा मिळवू शकतात.

महत्त्वाची कागदपत्रं किंवा बिलं किंवा काही वेळा फोटोदेखील आपण PDF या फॉर्मॅटमध्ये पाठवतो. मात्र, ग्लोबल सायबर सिक्युरिटी फर्म असलेल्या पालो अल्टो नेटवर्कने याबाबत खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. ईमेल अटॅचमेंटच्या स्वरुपात मालवेअर पाठवण्यासाठी पीडीएफ हा सगळ्यात पॉप्युलर फाईल फॉर्मॅट असल्याचं समोर आलं आहे.

PDF File Hacking
ChatGPT Hack : धक्कादायक! चॅटजीपीटी वापरणाऱ्या एक लाख लोकांचा डेटा हॅक; सर्वाधिक यूजर्स भारतातील - रिपोर्ट

लिंकपेक्षा पीडीएफला पसंती

साधारणपणे ई-मेल किंवा मेसेजच्या माध्यमातून एखादी वेब-लिंक पाठवून हॅकर्स यूजर्सना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, याऐवजी आता पीडीएफ फाईलच्या स्वरुपात मालवेअर पाठवण्याला अधिक पसंती मिळत आहे. अशा प्रकारे होणाऱ्या हॅकिंगचं प्रमाण 66.6 टक्के असल्याचं पालो अल्टोच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. म्हणजेच, जगभरात ई-मेलच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या 10 पीडीएफ फाईलपैकी 6 फाईल्समध्ये मालवेअर असू शकतो.

कसं करतो काम?

पीडीएफ फाईल स्वरुपात पाठवलेला हा मालवेअर ओपन होण्यासाठी तुमच्या फोन किंवा लॅपटॉपच्या परमिशन मागतो. यावेळी यूजर्स सर्व परमिशन्सना ओके करतात. यानंतर हा मालवेअर डिव्हाईसमधील माहिती चोरून तो हॅकर्सकडे पाठवतो. हे सर्व काम बॅकग्राऊंडला सुरू असल्यामुले यूजर्सना आपली माहिती चोरली जात आहे हे कळत नाही.

PDF File Hacking
Daam Virus : सावधान! थेट कॉल लॉग आणि कॅमेरा हॅक करतोय हा व्हायरस, केंद्रीय यंत्रणांनी दिला धोक्याचा इशारा

अशी घ्या खबरदारी

  • या स्कॅमपासून बचाव करण्यासाठी काही टिप्स सायबर तज्ज्ञांनी दिल्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या पीडीएफ फाईल्स उघडण्याचा प्रयत्न करू नका.

  • आपलं वेब ब्राऊजर अपडेट ठेवा, जेणेकरुन एखाद्या धोकादायक वेबसाईटवर जाण्यापूर्वी ते तुम्हाला वॉर्निंग देईल.

  • लॅपटॉप किंवा फोनमध्ये अँटीव्हायरस सॉफ्टवेअर घ्या. हे सॉफ्टवेअर अप-टू-डेट ठेवा.

  • मोबाईल किंवा लॅपटॉपची ऑपरेटिंग सिस्टीम नेहमी अपडेट ठेवा.

  • व्हॉट्सअ‍ॅप किंवा अन्य मेसेजिंग अ‍ॅप्सवर अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या फाईल्स किंवा लिंक ओपन करताना खबरदारी घ्या.

PDF File Hacking
Juice Jacking : चार्जिंगच्या माध्यमातून देखील चोरता येतो तुमचा डेटा अन् पैसे; काय आहे 'ज्युस जॅकिंग' स्कॅम?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.