Pench Tiger Reserve : अमेझॉनच्या जंगलात वापरली जाणारी 'फायर डिटेक्शन सिस्टीम' आता पेंचमध्ये; देशातील पहिलाच प्रयोग

Wildfire Control : पेंच व्याघ्र प्रकल्प फाउंडेशन आणि फॉरेस्ट फायर टेक्नॉलॉजी (एफएफटी) यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार झाला आहे.
Fire Detection System
Fire Detection SystemeSakal
Updated on

Pench Tiger Reserve Fire Detection System : जंगलातील वणव्यावर तातडीने नियंत्रण प्रस्थापित करता यावे तसेच यंत्रणेला आगीची माहिती मिळावी म्हणून पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘फायर डिटेक्शन सिस्टिम’चा वापर करण्यात येणार आहे. अशा प्रकारची यंत्रणा उभारणारा पेंच हा देशातील एकमेव व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे. यामुळे पेंच प्रकल्पातील ७० ते ८० टक्के वनक्षेत्रावर लक्ष ठेवणे सोपे होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पेंच व्याघ्र प्रकल्पाने बंगळूरच्या एका कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. या यंत्रणेचा वापर सध्या अमेरिकेतील ॲमेझॉनच्या जंगलातही केला जात आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प फाउंडेशन आणि फॉरेस्ट फायर टेक्नॉलॉजी (एफएफटी) यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार झाला आहे. सध्या जंगलातील आग शोधणे, तिचे शमन करणे आणि उपायांची अंमलबजावणी आणि व्यवस्थापन आदी कामे ‘उमग्रामीओ’ ही कंपनी काम करीत आहे. ॲमेझॉनच्या वर्षा वनातील आग विझविण्याचे काम या कंपनीकडून करण्यात येते.

कोलितमारा (पूर्व पेंच रेंज) मध्ये ५५ लाख रुपयांचा प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे. या जंगलात उन्हाळ्यात आगीचा धोका असतो. तो कमी करण्यासाठी लवकरच ही सेवा सुरू करण्यात येत आहे. उपकरणे खरेदीसाठी संपूर्ण खर्च आणि इंटिग्रेशन, कंट्रोल रूम आणि टॉवर मॉनिटरिंग सिस्टिम इन्स्टॉलेशन, सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन, चाचण्या आणि ट्रेनिंगसाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

Fire Detection System
Elon Musk Internet Service: भारतात लवकरच होणार स्टारलिंकची एंट्री, इलाॅन मस्कच्या दौऱ्यात होऊ शकते घोषणा

सध्या ‘फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया’ (एसएसआय) जंगलातील आगीबाबत सूचना देत असले तरी पेंच येथील नवीन तंत्रज्ञान रिअल-टाइम अलर्ट देईल आणि पेंचच्या जवळपास संपूर्ण क्षेत्रावर त्यामुळे लक्ष ठेवता येईल.

यंत्रणा अशी काम करेल

‘फायर डिटेक्शन सिस्टीम’ ही कॅमेऱ्याद्वारे फोटो काढेल. धूर, आगीच्या घटनांच्या स्थानांची माहिती मिळावी म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे. डिटेक्शन सिस्टीमच्या मुख्य उपकरणांमध्ये हाय-रिझोल्यूशन मॉनिटरिंग कॅमेरे, ३५० वॉटचे सोलर पॅनेल, रात्री आणि ढगाळ दिवसांमध्ये सिस्टिम चालू ठेवणाऱ्या बॅटरी आणि टॉवरमधून केंद्राकडे प्रतिमा पाठविण्यासाठी रेडिओ आणि अँटेनाचा वापर करण्यात आला आहे.

संपूर्ण जंगलाचा अभ्यास केल्यानंतर कंपनीने भू-जोखीम आणि इतर घटकांच्या आधारेच या भागाची निवड केली आहे. प्रकल्पामध्ये एक मॉनिटरिंग टॉवर आहे. ते संयुक्तपणे एक लाख हेक्टर जंगलाचे संनियंत्रण सक्षमपणे करू शकते. त्याच्या माध्यमातून वर्तुळाकार २० किलोमीटरच्या क्षेत्रावर नियंत्रण करता येणार आहे.

- डॉ. प्रभुनाथ शुक्ल (क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()