Independence Selfie Tips: आज सर्वांजवळ स्मार्टफोन आहेत. अनेकांना कोणताही प्रसंग असो तो सेल्फीशिवाय पुर्ण होत नाही. तसेच गेल्या काही वर्षात सेल्फीची क्रेझ जास्त वाढली आहे. पण कधी कधी असे होते की आपल्याला मनासारखी सेल्फी क्लिक होत नाही आणि मग अपेक्षेपेक्षा कमी लाईक्स मिळतात. तुम्हाला स्वातंत्र्यदिनानिमित्त सोशल मिडियावर शेअर करण्यासाठी परफेक्ट सेल्फी हवी असेल तर पुढील काही टिप्स लक्षात ठेऊ शकता.