Personal Data Leak : हॅकिंगची महामारी! जगभरातील 260 कोटी लोकांचा पर्सलन डेटा झाला लीक; 'अ‍ॅपल'चा धक्कादायक रिपोर्ट

2013 सालापासून 2022 पर्यंत डेटा ब्रीच होण्याच्या घटनांमध्ये तीनपट वाढ झाली आहे.
Personal Data Leak
Personal Data LeakeSakal
Updated on

डीपफेक, हॅकिंग आणि डेटा सुरक्षेबाबत सगळीकडे चर्चा सुरू असतानाच अ‍ॅपल कंपनीने एक धक्कादायक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये जगभरातील तब्बल 260 कोटी लोकांचा पर्सनल डेटा लीक झाल्याची माहिती या रिपोर्टमध्ये समोर आली आहे.

मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील प्राध्यापक डॉ. स्टुअर्ट मॅडनिक यांनी केलेल्या एका संशोधनात ही माहिती समोर आली आहे. 2013 सालापासून 2022 पर्यंत डेटा ब्रीच होण्याच्या घटनांमध्ये तीनपट वाढ झाली आहे. हॅकिंग आणि डेटा चोरी हा प्रकार एखाद्या महामारीप्रमाणे पसरत आहे, आणि यातून कोणीही सुटत नाहीये असं या संशोधनात म्हटलं आहे.

अधिक सुरक्षेची गरज

या रिपोर्टमध्ये म्हटलंय, की क्लाऊड स्टोरेजपेक्षा अधिक सुरक्षित अशा सिक्युरिटी सिस्टीमची आपल्याला गरज आहे. एंड-टू-एंड इन्क्रिप्शन. अ‍ॅडव्हान्स डेटा प्रोटेक्शन असे फीचर्स वाढवण्याची गरज असल्याचंही यात सांगण्यात आलं आहे. अ‍ॅडव्हान्स डेटा प्रोटेक्शन हे फीचर अ‍ॅपल कंपनीने लाँच केलं आहे. हे आयक्लाउड या क्लाउड स्टोरेजला अधिक सुरक्षित बनवतं. (Tech News)

Personal Data Leak
Mobile Data Security : मोबाईल दुरुस्तीला देण्यापूर्वी 'हे' काम करा; अन्यथा खासगी डेटा गेलाच म्हणून समजा..

अ‍ॅपलची सुरक्षाही धोक्यात

काही दिवसांपूर्वीच देशातील काही दिग्गज नेत्यांनी आपले आयफोन हॅक होत असल्याचा आरोप केला होता. अ‍ॅपल कंपनीने स्वतःच त्यांना याबाबत माहिती दिल्याचं म्हटलं जात होतं. यासोबतच, गेल्या महिन्यात 81.5 कोटी भारतीयांचा डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं वृत्त समोर आलं होतं. दोन आठवड्यापूर्वीच ताज हॉटेलच्या 15 लाख ग्राहकांचा पर्सनल डेटाही लीक झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.