PhonePe BharatPe Dispute : भारतपे आणि फोनपेचा 'पे' ट्रेडमार्क वाद मिटला!

'Pe' Suffix Dispute : भारतीय फिनटेक उद्योगाला बूस्ट मिळणार
Pe Suffix Trademark Dispute BharatPe and PhonePe Settled companies Withdraw Legal Cases
Pe Suffix Trademark Dispute BharatPe and PhonePe Settled companies Withdraw Legal Casesesakal
Updated on

Financial Technology : पाच वर्षांपासून चालू असलेला ट्रेडमार्क वाद शेवटी संपला आहे. भारतपे आणि फोनपे या दोन्ही फिनटेक कंपन्यांनी 26 मे रोजी संयुक्त निवेदन जारी करत हा वाद मिटल्याचे जाहीर केले. या ट्रेडमार्क वादामध्ये 'पे' या प्रत्ययावर नावे जसे की भारतपे आणि फोनपे यांच्या मालकी हक्कावरून वाद होता.

यापुढे कायदेशीर पेच निर्माण न करता दोन्ही कंपन्या आता आपापल्या मार्कांची नोंदणी करू शकणार आहेत. या सहकार्यामुळे भारतीय फिनटेक उद्योगाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.

भारतपेचे बोर्डाचे अध्यक्ष राजनिश कुमार यांनी समाधान व्यक्त करताना म्हटले आहे की, "हे संपूर्ण उद्योगासाठी सकारात्मक असून दोन्ही कंपन्या आता डिजिटल पेमेंट क्षेत्राचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतात."

Pe Suffix Trademark Dispute BharatPe and PhonePe Settled companies Withdraw Legal Cases
Scientist Shrinivas Kulkarni : कोल्हापूरच्या शास्त्रज्ञाला मिळणार खगोलशास्त्रातील प्रतिष्ठित शॉ पुरस्कार!

फोनपेचे संस्थापक आणि सीईओ समीर निगम यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, "यामुळे भारतीय फिनटेक उद्योगाला मोठी बूस्ट मिळणार आहे. आम्ही सामूहिकरित्या आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये डिजिटल पेमेंट्स वाढीसाठी काम करू शकतो."

Pe Suffix Trademark Dispute BharatPe and PhonePe Settled companies Withdraw Legal Cases
FSSAI App : भेसळयुक्त पदार्थांची तक्रार करणे आता तुमच्या हातात ; FSSAI ने लाँच केली 'ही' ऍप

या ट्रेडमार्क वादामुळे गेली पाच वर्षे दोन्ही कंपन्यांना कायदेशीर लढा द्यावा लागला होता. आता मात्र हा वाद मिटल्याने दोन्ही कंपन्या वेगवान वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.