नवी दिल्ली- देश आता कठोर टाळेबंदीतून मुक्त होत आहे. अनलॉक-1 ची सुरुवात झाली असली तरी अनेकजण घरीच राहणे पसंत करत आहेत. अनेक कंपन्यानी अजूनही कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मुभा दिली आहे. अशा परिस्थितीत आपले मित्र आणि घरच्यांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हिडीओ कॉलिंग हा उत्तम पर्याय आहे. सध्या व्हिडीओ कॉलिंगसाठी अनेक अॅप उपलब्ध आहेत. आपण आपल्या हेतूनुसार वेगवेगळ्या अॅपचा वापर करु शकतो. सध्या उपलब्ध असणारे काही मजेशीर व्हिडीओ कॉलिंग अॅप...
बन्च(BUNCH)
मित्रांसोबत लाईव्ह मोबाईल गेम खेळणे नवीन नाही. मात्र, बन्च अॅप तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत ऑनलाईन मोबाईल गेम खेळताना व्हिडीओ चाटिंग करणे शक्य करते. या अॅपच्या साह्याने तुम्ही ग्रुप कॉल करु शकता. त्यामुळे मित्रांशी संगनमत करुन मोबाईल गेम खेळण्याची मजा घेता येते. ग्रुप कॉलमध्ये तुम्ही 8 जणांना आमंत्रित करु शकता.
डिसकोर्ड(DISCORD)
डिसकोर्ड अॅपद्वारे तुम्ही टेक्ट मेसेज, व्हिडीओ कॉल, व्हिडीओ चॅट करु शकता. तसेच मोबाईल गेम खेळताना इतरांशी संवाद साधताना तुम्ही वरील तिन्हीपैकी कोणताही पर्याय वापरु शकता. हे अॅप विशेष करुन ऑनलाईन गेमर्ससाठी बनवण्यात आले आहे. यात तुम्ही तुमचे मित्र सोडून अन्य गेमर्संनाही आमंत्रित करु शकता.
हाऊसपार्टी( HOUSEPARTY)
हाऊसपार्टी अॅपच्या माध्यमातून तुम्हाला 8 जणांशी संवाद साधता येतो. मात्र, हे केवळ व्हिडीओ कॉल अॅप नसून तुम्हाला याद्ववारे मित्रांसोबत गेम खेळता येते. या अॅपच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात एका फासाचे चित्र आहे. यावर क्लिक करुन तुम्ही इनबिल्ड असलेले 4 मोबाईल गेम खेळू शकता.
स्क्वाड(SQUAD)
स्क्वाड अॅपमध्ये तुम्ही नेटफ्लिक्स, यू-ट्यूब किंवा टिकटॉकवरचा कंटेट शेअर करु शकता. त्यामुळे तुम्ही एकाच वेळी मित्रांसोबत चित्रपट किंवा व्हिडीओ पाहू शकता. मित्रांसोबत व्हिडीओ कॉल सुरु असताना तुम्ही शेअर केलेला कंटेन्ट एकत्र पाहू शकता. तसेच या अॅपद्वारे तुम्ही टेक्ट मेसेजही पाठवू शकतात.
मार्कोपोलो (MARCO POLO)
हे खरे तर व्हिडीओ चॅट अॅप नाही. यात तुम्हाला लाईव्ह वेळेत संवाद साधण्याची गरज नाही. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही स्पेशल इफेक्ट देत व्हिडीओ तयार करु शकता आणि तो तुम्ही मित्रांसोबत शेअर करु शकता. यामुळे पुढील व्यक्ती आपल्या सवडीनुसार हा व्हिडीओ पाहू शकते आणि त्यावर उत्तर देऊ शकते. विशेष करुन हे अॅप जवळचे नातेवाईक, जवळचे मित्र यांच्यासाठी बनवण्यात आलं आहे.
फेसबुक मेसेंजर(FACEBOOK MASSENGER)
फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून तुम्ही एकाचवेळी 50 लोकांसोबत संपर्क साधू शकता. तसेच व्हिडीओ चॅटींगसाठी वेळेची मर्यादा नाही. त्याबरोबर तुम्हाला फेसबुक अकाउंटवरुन सहभागी होण्याची गरज नाही. तुमची परवानगी असेल तरच पुढील व्यक्ती तुमची प्रोफाईल पाहू शकते.
एबीएलओ (ABLO)
या अॅपच्या माध्यमातून तुम्ही जगभरातील व्यक्तींशी बोलू शकतो. याच्या साह्याने जगभरातील नवीन मित्र जोडू शकतात. तसेच रिअल टाईममध्ये त्यांच्याशी चॅटींग करु शकता. हे अॅप जगाच्या नकाशावर तुमचे स्थान दाखवेल. तसेच तुम्ही आता कुठे संवाद साधत आहात हेही दाखवेल. भाषेची अडचणही या अॅपने सोडवली आहे. कारण या अॅपमध्ये ऑटो-ट्रान्सलेशनचा पर्याय आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.