Driving License in Pune : वाहन योग्यता प्रमाणपत्र सहा मिनिटांत

Pune RTO News : पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अत्‍याधुनिक यंत्रणा
वाहन योग्यता प्रमाणपत्र आता सहा मिनिटात मिळणार आहे.
वाहन योग्यता प्रमाणपत्र आता सहा मिनिटात मिळणार आहे. esakal
Updated on

Driving License : वाहन योग्यता तपासणी प्रमाणपत्र आता अवघ्या सहा मिनिटांत मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्‍या जागेत त्‍यासाठी अत्‍याधुनिक यंत्रणा उभारली जाणार आहे.

आठ महिन्यांत ही यंत्रणा उभारून त्‍याद्वारे २६ पेक्षा अधिक तपासण्या जलद गतीने केल्‍या जाणार आहेत. त्‍यानुसार ही वाहने रस्त्यावर धावण्यास योग्य असल्‍याचे प्रमाणपत्र वाहनधारकांना प्राप्‍त होणार आहे. प्रमाणपत्र मिळण्यास गती येणार असल्‍याने नागरिकांना आता वाहन योग्यता प्रमाणपत्र तपासणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही.

सध्या आरटीओ कार्यालयाच्या मागील बाजूस मोटर निरीक्षकांमार्फत वाहनांच्‍या ब्रेकची तपासणी होते. दिवसाकाठी सुमारे १५० वाहनांची तपासणी होते. उर्वरित वाहनांना पुन्‍हा दुसऱ्या दिवशी बोलावले जाते. ही स्‍थिती टाळण्यासाठी मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्‍या जागेत अद्ययावत यंत्रणा उभारून तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहेे.

सर्व परवानगी प्राप्त झाल्या असून लवकरच या प्रकल्पाचे कामकाज सुरू होणार आहे. ऑटोमॅटिक रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होणार असल्‍याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाहन योग्यता प्रमाणपत्र आता सहा मिनिटात मिळणार आहे.
Porsche Car in India : सध्या बहुचर्चित असलेली 'ही' कार आहे 31 कोटीची

एकाच वेळी तिपटीने वाहनांची तपासणी

या प्रकल्‍पात दोन लेन अवजड आणि दोन लेन हलक्या वाहनांसाठी अशा चार लेन उपलब्ध असणार आहेत. टेस्टिंग स्टेशन असल्याने या दोन्हींमध्ये एकाच वेळी तीन वाहने म्हणजेच बारा वाहनांची एकाच वेळी तपासणी होणार आहे. स्टेरिंग, जॉइंट, हेडलाईट आणि अंडर बोडी इन्स्पेक्शन, ब्रेक या टप्प्याने सर्व २६ तपासण्या पूर्ण केल्‍या जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आली.

वाहन योग्यता प्रमाणपत्र आता सहा मिनिटात मिळणार आहे.
RTO : आरटीओच जेव्हा बेशिस्त होते

चिखली मोशी येथील गट क्रमांक ५३९ या ठिकाणी जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परिवहन विभागास हस्तांतर करण्यात आली. त्या नुसार या ठिकाणी अद्ययावत तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहे. यामुळे मानवी तपासणीपेक्षा एकाच वेळी तिपटीने अधिक वाहनाची तपासणी होणार असल्‍याने वाहनधारकांनी तासनतास असणारी प्रतिक्षा थांबणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.