PM Modi Robot : पंतप्रधान मोदींनी दिली सायन्स सिटीला भेट, स्वतः चालवला रोबोट; पाहा व्हिडिओ!

Robot Exhibition : यावेळी पंतप्रधान मोदी, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेदेखील उपस्थित होते.
PM Modi Robot
PM Modi RoboteSakal
Updated on

'व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट'ला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने गुजरातमध्ये आज एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. अहमदाबादमधील सायन्स सिटीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी पंतप्रधान मोदी, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेदेखील उपस्थित होते. PM मोदींनी यावेळी रोबोट एक्झिबिशनला भेट दिली. यावेळी रोबोट्सच्या एका पथकाने त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधानांनी रोबोट्सची पाहणी करून, वेगवेगळ्या प्रकारच्या रोबोट्सबाबत माहिती जाणून घेतली.

पंतप्रधानांनी चालवला रोबोट

यावेळी खाण क्षेत्रात देखील कशा प्रकारे रोबोटचं योगदान ठरू शकतं, हेदेखील पंतप्रधानांनी पाहिलं. त्यांनी हा एक रोबोट चालवून देखील पाहिला. यासोबतच एका रोबोटने पंतप्रधानांना चहा देखील आणून दिला.

PM Modi Robot
Robotics : रोबोटिक्स क्षेत्रासाठी मोदी सरकार घेणार पुढाकार; आर्थिक मदतही मिळणार - रिपोर्ट

याठिकाणी डीआरडीओने तयार केलेले रोबोट देखील प्रदर्शनासाठी मांडण्यात आले आहेत. तसंच, मायक्रोबॉट, अ‍ॅग्रीकल्चर रोबोट, मेडिकल रोबोट, स्पेस रोबोट आणि अन्य प्रकारचे रोबोट्स दाखवण्यात आले आहेत. सोबतच, इस्रोने तयार केलेले रोबोट देखील याठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत.

तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने किती प्रगती केली आहे, हे या प्रदर्शनातून दिसून येत होतं. तंत्रज्ञानामुळे तरुणांमध्ये जिज्ञासा जागरुक होत आहे, हे पाहून आनंद झाला; असं मत पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केलं.

PM Modi Robot
Elon Musk on COVID Vaccine : 'कोविड लसीमुळे आली होती रुग्णालयात जायची वेळ', इलॉन मस्कचा खळबळजनक दावा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.