PM Surya Ghar Yojana : हर घर सोलर पॅनेल; देशातील 1 कोटी लोकांना मिळणार ३०० युनिटपर्यंत वीज मोफत

Central Government Scheme : सरकारची नवी योजना,वीजबिलाचा त्रास संपणार
PM Surya Ghar Yojana
PM Surya Ghar Yojanaesakal
Updated on

Electricity Scheme : वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौरऊर्जा आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी एक योजनेची घोषणा केली होती, ज्याचे नाव आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. या योजनेद्वारे लोकांना त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यास प्रोत्साहन दिले जाणार होते.

या योजनेद्वारे  देशातील 1 कोटी लोकांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज  दिली जाईल. यामुळे एक कोटी कुटुंबांची वार्षिक 18000 कोटी बचत होईल. याशिवाय उर्वरित वीज विकूनही ते उत्पन्न मिळवू शकतील. देशातील ज्या नागरिकांना वीजबिलाचा त्रास होत आहे त्यांच्यासाठी ही योजना अतिशय फायदेशीर ठरणार आहे.

PM Surya Ghar Yojana
Reduce Electricity Use : भरमसाठ वीजबील येतंय? 'या' सोप्या आणि पर्यावरणपूरक मार्गांनी कमी करा विजेचा वापर

काय आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. ही योजना सुरू करण्यामागील सरकारचे उद्दिष्ट देशातील 1 कोटी घरांना मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करून या योजनेची माहिती दिली आहे. 

या प्रकल्पासाठी केंद्र सरकार 75000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार आहे. या योजनेंतर्गत लोकांच्या घरांवर  सोलर पॅनल बसवण्यात येणार असून त्यामुळे त्यांना ३०० युनिटपर्यंत मोफत विजेचा लाभ मिळणार आहे.

PM Surya Ghar Yojana
Anant Ambani Watch : मोदीच्या शपथविधी समारंभात २० कोटीचे घड्याळ घालून पोहोचले अनंत अंबानी;फोटो होतोय व्हायरल

कोणत्या राज्यातून किती अर्ज आले?

यामध्ये आसाम, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. येथील लोक या योजनेत प्रचंड रस दाखवत असून, आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांनी यासाठी अर्ज केले आहेत.या योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया कर्जदेखील देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.